१२-१२-१९५५ विद्या, प्रज्ञा करुणा, शील वमेत्री या पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे - Page 499

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या . . . . चारित्र्य बनविले पाहिजे ४५९

जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकटं जाण्याचं धैर्य केलं पाहिजे. एकटं जाण्याचं धैर्य मी करतो. (टाळ्या) हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगीत नाही.

एक डॉ. पिक्विक व त्याचे दोन चार भिडू होते. तो आपल्या भिडूंना म्हणाला की, मी तुम्हाला जत्रा दाखवितो तो आपल्या भिडूसह एका गावात गेला व तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहाण्यासाठी घेतल्या. त्या गावात इलेक्शन होतं: डॉ. पिक्विकच्या कंपनीतला सॅम वेलर नावाचा पोऱ्या त्याच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरवात केली. भित्र्या डॉ. पिक्विकने विचारले की, “What are you doing there?” (तू तिथे काय करतो आहेस ?) त्याने उत्तर दिले की “ There is a0i9 cro॥०, झा.” (सर, तिथे मोठा जमाव आहे.) सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की Go with bigger crowd and not with little 0n९ (मोठ्या जमावा- सोबत जा, लहानासोबत जाऊ नकोस.) आणि पुनः असं सांगितलं की '* हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा. अथवा त्याच्या मागे जा. “ माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की, केवळ अशा प्रकारच्या ' जमावा ' मागे तुम्ही जाऊ

नका.

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. ' महाजनो येन गतः सपन्थः ' ही पर प्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य

वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे.