५१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किंमत होईल; व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या.प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती ? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय ?
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, ' अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे,. मांसांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ?
मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या 'समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे ? ते गृहस्थ म्हणाले, ' एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या.'। मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता ? तुम्ही का हे करीत नाही ? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ? ओढाना तुम्ही मेलेली ढोरे !
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, * पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता ? “' मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा. पार्लमेंट, असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी