राजकारणात भक्तीला . . . . . निर्माण होण्याचे भय असते ५३७
म्हणतात. हा देश असा विक्षिप्त विचारसरणीत सापडला आहे. त्यासाठी आता सर्वांनी जागृत राहून हे प्रकार बंद केले पाहिजेत.
आपण नवीन घटना घेतली आहे. आपल्याला या नवीन पद्धतीचा अनुभव नाही. ती जर अत्यंत दक्षतेने राबविली नाही तर या देशाचा नाश होईल. केवळ पांढऱ्या टोप्यांनी काम चालणार नाही. सगळ्या राष्ट्राने बसून राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धिमान अनेक आहेत. मी पाच वर्षे कॅबिनेटमध्ये होतो. पाच वर्षाचा मला अनुभव आहे. आठ दिवसातून ' एकवेळ मी काँग्रेसच्या बैठकीला हजर राहात असे. जवाहरलाल चांगले तोलून पाहिले आहेत. त्याचे डोके केवळ पोकळ भोपळ्याप्रमाणे आहे. "त्यापलिकडे काही नाही. जवाहरलालचे नाक सरळ आहे. रंग गोरागोमटा आहे. म्हणून त्यास महत्त्व येत असेल तर गोष्ट वेगळी. पण अशी व्यक्ती शारदा नाटकात | म्हटल्याप्रमाणे ' पाहिजे मुलीला सुंदर नवरा ' या दृष्टीने उत्तम ठरेल. पण नेता बुद्धिमान पाहिजे, कणखर पाहिजे, तो देशाचे कार्य करणारा हवा असेल तर असे अनेक लोक सापडतील. पण तुम्हाला मात्र तोच पाहिजे ना ! विषयांतर झाले आणि काहींना ते अरुचकर वाटले तर त्यांनी शमा करावी. तुम्ही कदाचित मला मते देणार नाहीत. पण त्याची मला फिकीर जाही
मी चांगले .ओळखतो की, या देशाच्या जातीगत राजनीतीमध्ये आम्हाला कोणतेही स्थान नाही. राजकीय जीवन व्यतीत करता येत नाही, अशी स्थिती आहे. जीवनातील पाच वर्षे मी केंद्रिय मंत्रीमंडळात काढली व दहा वर्ष केंद्रीय विधी मंत्रीमंडळात सदस्य म्हणून राहिलेलो आहे. आता मला पाहाण्यासारखे काही बाकी राहिले नाही. पूर्ण समाधान झाले आहे. राष्ट्राची हानी होऊ नये. यासाठी हे सारे मी करतो. आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ती तशीच पुढे सत्ताधारी राहिली तर या देशाला आग लागल्याशिवाय राहाणार [नाही. ] ['”* ]
शेवटी स्थायी समितीचे चेअरमन श्री. चौधरी यांनी आभार मानले, आभार मानताना श्री. चौधरी म्हणाले, ” काँग्रेसच्या राजकारणात, पडद्यामागे कशा कशा गोष्टी चालतात व काँग्रेस राज्य कसे हुकूमशाहीकडे चालले आहे, याची खात्री आम्हास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरून पटली आहे. त्यासाठी, आपण सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशकार्य करण्यास दीर्घायु लाभो अशी मी कार्पोरेशनच्या वतीने प्रार्थना करून
आभार प्रदर्शन संपवितो. "' १
. शि...
* मी पाहिलेले बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भिक्षु सुमेध, पृ. १०९-११४.
२ प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७ ऑक्टोबर १९५६.
एनडब्ल्यू-६९-भाग-३)-३५