१५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते - Page 576

५३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पक्षामार्फतच चालू शकतो. त्याचे काय घोर परिणाम या देशाला भोगावे लागतील याची कल्पना पुष्कळांना नाही. काँग्रेसच्या चालू राजवटीतील सुवेझ कॅनलबाबतचे नेहरूंचे धोरण घ्या. इजिप्तचे राष्ट्रपती नासेरने त्या कॅनलचे राष्ट्रीयीकरण केले आहे. नेहरू त्यास पाठिंबा देऊन एंकप्रकारे चंचलता « प्रदर्शित करीत आहेत. याबाबतीत मुख्य प्रश्‍न आहे तो हा की, जगाचा व्यापार-उदिम ज्या कॅनलच्या जलमार्गाच्या रहदारीवर अवलंबून आहे तो कॅनल एकाच राष्ट्राच्या अखत्यारीखाली असला पाहिजे की आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असला पाहिजे ? भारताचा फार मोठा व्यापार या कॅनलच्या मार्गाने होतो.

पंडित नेहरू म्हणतात, म्हणून सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करा, असे सर्व लोक म्हणतात. पण नासेर यांनी भारताची जहाजे कालव्यातून नेणे बंद केले तर विकास योजनेचे काय होईल ? याचा विचार करा. आज नासेर तुमचा दोस्त आहे. उद्या नासेरने कालवाबंदी केली तर काय होईल ?

या देशात भक्तियोग फार : बोकाळलेला आहे. भारताची घटना तयार झाल्यानंतर यासंबंधात मी पार्लमेंटमध्ये शेवटचे भाषण दिले व त्यात याची मीमांसा केली होती. भक्तीला राजकारणात विभूतीपूजेचे रूप येते. त्यातून सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते. म्हणून आपण फार जागृत राहिले पाहिजे, असा मी त्यावेळी इशारा दिला होता. चमत्कारिक गोष्टींना फाजील महत्त्व दिले जाते. गटारातील पाणी पिणाऱ्यांना गटारातच सर्वत्र ब्रह्म दिसते. त्यालाच महासाधु म्हटले जाते. अशी पूर्वपरंपरा आमच्या देशात चालत आलेली आहे.

जमिनीचे तुकडे गोळा करतो, दगडधोंडे गोळा करतो, काय त्याचे नाव ? (श्रोत्यांतून आवाज, विनोबा भावे) होय. तोच तो विन्या, काय गोळा केले आहे त्याने ? नाकातून एकीकडे शेंबूड वाहात असता दुसरीकडे तो व्याख्याने देतो. देशाच्या राजकारणाशी त्याचा काय संबंध ? पार्लमेंट कशासाठी आहे ? त्याच्यासाठी पार्लमेंट का मोडून टाकीत नाही ? हे गृहस्थ ठिकठिकाणी हिंडून भूदानासाठी जमिनी गोळा करीत आहेत. एवढेच जर आहे तर लोक विनोबा भावे यांनाच पंतप्रधान का करीत नाही ? विनोबा भावे यांनी पंतप्रधान व्हावे व देशातील जमिनीचा प्रश्‍न सोडवावा, नाही तर उगीच हा चोंबडेपणा कशाला हवा ? हे ना धड काँग्रेस सरकारचे काम ना धड भावेचे काम असे होऊन बसले आहे.

या देशात बुवाबाजीचे फार मोठे खूळ आहे. एखाद्या माणसाने काही विचित्र केले तर तो साधुपुरुष बनतो. त्याने. जर फाटके कपडे .घातले, गटारातील पाणी तो प्याला अगर लंगोटी लावली असे काही विचित्र केले की, या देशात त्या माणसाला साधुपुरुष मानतात. पण एखाद्याने स्वच्छ कपडे वापरले, स्वच्छ पाणी पाहिजे असे म्हटले की, मोठा मिजासखोर आहे असे