क ३४६ |
दुःख मार्ग दाखविणे
बुद्ध धर्माचे अंतिम ध्येय
“ भारताचे माजी कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सविता आंबेडकर दिल्लीहून आज दिनांक १३ नोव्हेंबर १९५६ रोजी दुपारी काठमांडू येथे जगातील बौद्ध धर्मीय लोकांच्या चौथ्या जागतिक परिषदेत भाग घेण्यासाठी आले. काठमांडू विमानतळावर उभयतांचे भव्य स्वागत करण्यात आले. नेपाळ सरकारतफे चिफ् ऑफ प्रोटोकॉल, भिक्षू आनंद कौशल्यायन, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव त्यांच्या स्वागताकरिता हजर होता. डॉ. आंबेडकर पती-पत्नी विमानातून खाली उतरताच ' आंबेडकर जिंदाबाद “ अशा गगनभेदी घोषणांनी तेथील वातावरण दुमदुमून गेले होते. तशाच घोषणा करीत त्यांना मिरवणूकीने नेपाळ सरकारच्या '' सितल महालात “' पोहोचविण्यात आले. नेपाळ सरकारचे खास पाहुणे म्हणून ते तेथे राहाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून त्यांना नेपाळी हवामान चांगलेच मानवले असे दिसते. काठमांडूतील अस्पृश्य समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तसेच महिला संघटनेच्या मुख्यांनी आज रात्री डॉ. आंबेडकरांची भेट घेऊन नेपाळातील अस्पृश्यांच्या परिस्थितीची त्यांना माहिती
_ सांगितली.
जगातील बौद्ध धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद दि. १५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या परिषदेस हजर राहाण्यासाठी जगातील निरनिराळ्या देशातून बौद्ध भिख्खु, भिख्खुणी, प्रतिनिधी, खास आमंत्रणावरून' बोलविलेल्या प्रमुख व्यक्ती, ऑब्झरव्हर्स इत्यादी मिळून ६२५ लोकांना आमंत्रणे पाठविण्यात
आली आहेत. ही परिषद धर्मोदय सभा, काठमांडू हिच्यावतीने घेण्यात आली
असून तिचे अध्यक्ष, महाथेरो अमृतानंद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकंर' पती-पत्नीला बौद्ध धर्माची धर्मदिक्षा नागपूरला देणारे कुशीनगरचे ८३ [वर्षाचे ] महाथेरो भिख्खू चंद्रमणी आले असून त्यांच्या तिसऱ्या तुकडीत पाच लोक होते. तिचे नेतृत्व भिख्खू चंद्रमणी यांनीच केले [होते.. ] भिक्षु चंद्रमणीशिवाय