५४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
भारतातून आलेल्या भिक्षुत वर्ध्याचे (नागपूर) भिक्षु भदन्त आनंद कौशल्यायन अगरतला (त्रिपुरा, कलकत्ता) वेणुवन विहाराचे भिक्षु आर्यमित्रही, आज विमानाने काठमांडूत दाखल झालेले आहेत
पंडित राहूल सांकृत्यायन परिषदेसाठी आले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेची आठवण सांगताना ते लिहितात, नवम्बर १९५६ का वह दिन नही भूल सकता, जबकी नेपाल में डॉ. बाबासाहाब आंबेडकरने बडे भावावेशमें पर गंभीरता के साथ घोषित किया -दो वर्ष और जी जावूं तो भारत मे पाँच करोड बौद्धों को दिखा दूँगा | हजार अफसोस की वह संकल्प पूरा नही हुआ “*
' जागतिक बौद्धधर्मीय परिषदेच्या चौथ्या सभेमध्ये जगातील चौतीस राष्ट्रांनी भाग घेतला असून, त्यात प्रामुख्याने बर्मा, कॅनडा, सिलोन, चायना, झेकोस्लोव्हाकीया, इस्थोनिया, फार्मोसा, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, हंगेरी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, लडाख, लाटव्हिया, लाओस, मलाया, नेपाळ, पाकिस्तान, पेनांग, फिलीपाईन्स, स्वीडन, सिक्कीम, सिंगापूर, थायलंड, तिबेट, युनायटेड किंगडम, यु. एस. ए., यू. एस. एस. आर., त्या त्या देशातील प्रतिनिधी, खास निमंत्रणाने 'बोलाविलेले पाहुणे, बुद्ध भिक्षु, बुद्ध भिक्षुणी, ऑब्झरव्हर्स इत्यादी मिळून ४०० निमंत्रित परदेशीय प्रतिनिधी काठमांडूतील सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. काठमांडूतील भव्य अशा तुडखेल ग्राउंडवर हा जागतिक चौथ्या बौद्धधर्मीय परिषदेचा मेळावा भरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आज भारतीय पद्धतीचा पोषाख केला होता. उलनची पँट आणि गळ्यापर्यंत बटन असलेला भारतीय पद्धतीचा त्याच रंगाचा कोट घातला होता आणि डोक्यावर बफ रंगाची नक्षीदार टोपी घातली होती.
बौद्धधर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या तीस देशांनी आणि संस्थांनी आपापले संदेश पाठविले होते. हे संदेश वाचून झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मी माझ्या देशातून किंवा संस्थेकडून तुम्हाला संदेश घेऊन आलो नाही. या देशामध्ये, नेपाळात, बुद्धाचा जन्म झाला. परंतु २५०० वर्षानंतर बुद्ध धर्म नाहीसा झाला आहे. बुद्ध धर्माचा वृक्ष अद्याप आहे, त्याचा पाला सुकलेला आहे. परंतु त्याचे मूळ सुकलेले नाही. त्याला पाणी घातले तर तो वृक्ष वाढेल अशी माझी
* प्रबुद्ध भारत : २४ नोव्हेंबर १९५६
२ आधुनिक संसार का महान व्यक्तित्व: डॉक्टर आंबेडकर : महापण्डित राहुल सांकृत्यायन
पू. ८