२१-७-१९४६ या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत नाहीत - Page 85

या देशातील कोणतेही . . . . . लढ्याला पाठिंबा देत नाहीत .. .. ५४७

महिलांच्या बाबतीत मला दोन शब्द सांगावयाचे आहेत. स्त्रियांनी या सत्याग्रहात भाग घेतला आहे. ही एक फारच अभिमानाची गोष्ट झाली आहे. कॉग्रेसच्या चळवळीमध्ये स्त्रिया भाग घेत होत्या म्हणून त्यांना त्याचा फार अभिमान वाटत होता. परंतु आजच्या परिस्थितीवरून दिसून येईल की, अस्पृश्य समाजातील स्त्रिया देखीलं इतर स्त्रियांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे राहिलेल्या नाहीत. आपल्या चळवळीचे लोण आज स्त्री-वर्गातही जाऊन पोहोचले आहे. आपणाला जर परिस्थिती अनुकूल असती तर याच्यापेक्षाही आपल्या जास्त महिला तुरुंगात गेल्या असत्या. |

रेशनिंग सुरू असल्यामुळे आम्हाला पुष्कळ अडचणी उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळेच सत्याग्रह आघाडीवर आम्हाला पुष्कळ माणसे आणता येत नाहीत. काँग्रेस सरकारने रेशनिंग नाहीसे करावे. माझे त्यांना आव्हान आहे की, मी कमीत कमी १ लाख तरी माणसे तुरुंगात सहज पाठवू ,शकेल.

मी देशविघातक असे काय केले आहे हेच मला कळत नाही. राऊंड टेबल . कॉन्फरन्सच्या वेळेपासून माझ्या अगंदी अलिकडच्या सरकारी नोकरीपर्यंत माझी

सर्व कामगिरी काँग्रेसवाल्यांनी नीट आठवावी. इंग्रजांच्याविरूद्ध दटावून

सांगणाऱ्या मंत्र्यांमध्ये मी प्रमुख होतो आणि इंग्रजांना पाहिले तर ज्यांना अजून

भीती वाटते असे मंत्री कायदेमंडळात जाऊन बसले आहेत. काँग्रेसच्या

तिकीटावर जी १५ अस्पृश्य माणसे या प्रांतात निवडली आहेत [त्यांना ] [माझा ] [प्रश्‍न ]

आहे की, आपल्या आयुष्यात त्यांनी या समाजासाठी किंवा देशासाठी किती तास

खर्चिले आहेत ? ज्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी [देह ] [झिजविला ] [त्यांना ] [जागा ]

न देता उपटसुंभांना आमदार करण्यात [आले ] [आहे. ] गोरगरिबांचे राज्य व्हावे,

लोकशाहीचा राज्यकारभार चालवावा अशी [काँग्रेसची ] [इच्छा ] [असेल ] [तर ] [२००० ] वर्षे

ज्यांची गळचेपी झाली, त्या आज [६-७ ] [कोटीपर्यंत ] [असलेल्या ] [अस्पृश्यांना ] [त्यांचे ]

योग्य हक्क मिळाले पाहिजेत.