२५२
अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास
जगातील कोणतीही शक्ती या देशाला
एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही
संविधान सभेच्या कामकाजाला ९ डिसेंबर १९४६ पासून सुरूवात झाली. संविधान सभेवर एकूण २९६ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी २०७ सदस्यांनी कामकाजात भाग घेतला. ८९ सदस्य अनुपस्थित होते. किंबहुना त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता हे म्हणणे संयुक्तिक होईल. या सदस्यांमध्ये बहुतांश मुस्लिम लीग आणि
संस्थानिकांचे प्रतिनिधी होते.
दिनांक १३ डिसेंबर १९४६ ला संविधानाचे साध्य आणि उद्दीष्ट सांगणारा ठराव पं. जवाहरलाल नेहरु यांनी मांडला. हात वर करुन नेहमीच्या सर्वसाधारण पद्धतीने नव्हे तर सर्वांनी उभे राहून गांभीर्याने हा ठराव पारित करावा अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. श्री. पुरुषोत्तमदास टंडण यांनी ठरावाला अनुमोदन देणारे भाषण केले.
डॉ. एम. आर. जयकर यांनी पं. नेहरुंच्या ठरावाला दुरुस्ती जोडणारा ठराव मांडला. त्यांच्या मते भारताला एक स्वतंत्र, लोकशाहीवादी, सार्वभौमराज्य निर्माण करण्यासाठी, संविधानाला त्या संदर्भात आकार देण्यासाठी मुस्लिम लीग आणि भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, जेणेकरुन या ठरावाला एक शक्ती प्राप्त होईल. त्यासाठी वरील दोन संघटनांचे प्रतिनिधी, जर त्यांची इच्छा असेल, सहभागी होईपर्यंत या ठरावावरील चर्चा पुढे ढकलण्यात
यावी.
काही अपवाद वगळता अनेक सदस्यांनी डॉ. जयकरांच्या दुरुस्तीला कडाडून विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत चर्चा स्थगित होता कामा नये अशी त्यांची
भूमिका होती.
_ या पार्श्वभूमीवर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बोलण्यासाठी पुकारले. हा दिवस होता मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर १९४६. संविधान सभेचे कामकाज सुरू झाल्याच्या ९ व्या दिवशी डॉ. आंबेडकरांचे सभेपुढे पहिले भाषण झाले. डॉ. जयकरांप्रमाणेच