१७-१२-१९४६ अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही - Page 88

५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. आंबेडकर सभागृहाचा रोष ओढवून घेतील आणि त्यांच्या रोषाला पात्र होतील असे अनेकांना वाटले. परंतु प्रत्यक्षात घडले ते अनपेक्षित. या प्रसंगाचे वर्णन करताना सभेचे एक सदस्य आणि प्रत्यक्षदर्शी न. वि. गाडगीळ म्हणतात, ' त्यांचे भाषण इतके मुत्सद्याला शोभणारे होते, इतके कदुतेशिवाय, इतके प्रामाणिकपणे आव्हान देणारे होते की, संपूर्ण सभागृह मतिगुंग झाल्याप्रमाणे एकत होते. प्रचंड उत्साहानी सर्व सदस्यांनी त्यांच्या भाषणाचे स्वागत केले. सभागृहाच्या लॉबीमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वानी त्यांना

गराडा घातला." "

या प्रसंगाचे वर्णन करताना डॉ. आंबेडकरांचे एक चरित्रकार श्री. धनंजय कीर लिहितात, " एक मोठ्या डोक्याची, खंबीर हनुवटीची, लंबवर्तुळाकार, गंभीर नि तेजस्वी चर्यची आणि उत्तम पोषाखातील भरदार व्यक्ती जयकरांच्या सूचनेला पाठिबा देण्यास उभी रांहिली. ती व्यक्ती म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. ते काँग्रेसचे कट्टर विरोधक. त्यांनी काँग्रेसच्या मतप्रणालीची नि नेत्यांची जाहीर नि खाजगीरित्या अनेक वेळा टर उडविली होती. साहजिकच घटना समितीतील सर्व सभासदांच्या नजरा त्या वक्त्याकडे खेचल्या गेल्या. आंबेडकरांनी सर्व सभासदांवर आपली नजर एकदा फिरविली, प्रत्येक सभासदाला वाटले की जयकरांच्या ठरावाला पाठिंबा देऊन जयकरांबरोबरच आंबेडकरही आपली पत-प्रतिष्ठा घालवून बसणार. काँग्रेसचे नेते हे राष्ट्रातील कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुमशक्तीचे प्रतीक. त्यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे स्वतःच्या लौकिक जीवनाची इतिश्री करुन घेण्यासारखे होते. काँग्रेसचे सभासद .आपल्या कट्टर शत्रुला पाणी पाजावयास आतूर झाले होते.

राष्ट्रातील महान नेते आपल्या अवती-भवती बसलेले आहेत याची आंबेडकरांना जाणीव होती, त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. प्रत्यक्ष भाषण ऐकण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. आंबेडकरांनी गंभीर स्वरात अन्‌ वक्तृत्वपूर्ण भाषेत आपल्या भाषणास मोठी आत्मविश्वासाने सुरवात केली. ' २

ते म्हणाले,

अध्यक्ष महोदय, आपण या ठरावावर बोलण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. काही असो, आपल्या या निमंत्रणाने मी आश्चर्यचकित झालो आहे हे कबूल करावे लागेल. मी या अपेक्षेत होतो की,

१ Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 13, PP7.

२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ले. धनंजय कीर, पृ. ४००.