MR/Khand_19 - Page 26

त्यांना दिले नाही. आपण जाणकारांकडे हे काम सोपवले. त्यातल्या वसंत मून, प्र-श्री-नेरुरकर, आ.ना.पेडणेकर या अनुवादकांचे काम पूर्ण केल्यानंतर निधन झाले आहे. गौतम शिंदे, विजय कवीमंडन, प्रा.विनोद नंद, डि.वाय.हाडेकर, डॉ.आर.के.क्षीरसागर यांनी त्यांच्याकडील अनुवादाचे काम पूर्ण करुन आमच्याकडे सुपूर्द केले आहे. हे अनुवाद तज्ञांकडून तपासून घेतले असून त्यांची छपाई लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्यल्प मनुष्यबळ आणि उपरोक्त अडचणी यामुळे हे काम धीम्या गतीने चालू आहे. उर्वरित खंडांच्या अनुवादकांचे कामही

लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. दरम्यान आवृत्त्या

संपलेल्या ग्रंथांच्या प्रतींना खूप मागणी आहे. त्यांच्या नव्या आवृत्त्या काढण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. दुसऱ्या खंडाची दुसरी आवृत्ती लवकरच उपलब्ध होईल.

१९ व्या खंडात बाबासाहेबांच्या ८७ लेखांचा समावेश असून त्यातील समकालीन संदर्भ कळण्यासाठी आवश्यक ती ४७ परिशिष्टे सोबत दिली आहेत.

२० व्या खंडात बाबासाहेबांचे ११७ लेख असून सोबत २६ परिशिष्टे दिलेली आहेत. बाबासाहेबांचे समग्र मराठी साहित्य बाचण्याकरिता अभ्यासकांनी खंड १८, १९ ब २० एकत्रित बाचायला हवेत. अठराव्या खंडात आम्ही बाबासाहेबांची भाषणे छापतान। मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता व प्रबुध्द भारत यामधील त्यांची भाषणे घेतली होती. त्यांची पुनरुक्ती टाळण्यासाठी या १९ व २० खंडांमध्ये या भाषणंचा समावेश केलेला नाही.

१९ व्या खंडाच्या पृष्ठ ५७९बर, व्यक्ती, संस्था, कार्यसूचीमध्ये, सहस्त्रबुध्दे, गंगाधर निळकंठ यांच्याबददूल माहिती देताना महाडच्या सत्याग्रह परिषदेत दि.२५ डिसेबर,१९२७ला मनुस्मृती दहनाचा ठराव मांडून हयांच्याच हस्ते बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करविले होते असे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मनुस्मृती दहनाचा ठराव श्री.सहस्त्रबुध्दे यांनी मांडला असला तरी प्रत्यक्ष मनुस्मृतीचे दहन मात्र त्यांचे हस्ते करण्यात आले नसून “ हा विधि सभेस जमलेल्या अस्पृश्य वर्गाच्या साधूसंतांच्या हातून करण्यात आला. ” (पाहा- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, संपा.वसंत मून, महाराष्ट्र शासन, १९९०,पृ.१६३.) या नजरचुकौबदद्‌ल दिलगीर आहोत.

(अठरा) न -ल्यू - -३ 7