मराठी अनुवाद आम्ही लवकरात लवकर प्रकाशित करावेत यासाठी दिल्लीच्या डॉ.आंबेडकर फौंडेशनचे प्रमुख आयु.किशोर बाबू यांनी आमच्याकडे आग्रह धरला. बहुजन समाज पक्षाचे नेते प्रा.सुरेश माने यांनी या कामी पाठपुरावा केला. संपादक
आणि पत्रकार मित्र आयु.कुमार केतकर (लोकसत्ता), आयु.अरुण खोरे (सकाळ),
आयु.उत्तम कांबळे (सकाळ), आयु.बबन कांबळे (सम्राट), आयु.बाबा गाडे (महानायक), विजय चोरमारे, बंधुराज लोणे, स. सो. खंडाळकर, यदु जोशी, विद्याधर दाते या सर्वांनी समितीबद्दल लेखन करून समितीच्या कामांना गती दिली.
दुबई येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल मिशनने एप्रिल २००४ मध्ये आम्हाला डॉ.आंबेडकर जयंती समारंभाचे प्रमुख व्याख्याते म्हणून निमंत्रित करुन मध्यपूर्वेतील
आखाती देशांमध्ये आमचो व्याख्याने आयोजित केली होती. दुबई , आबूधाबी,
शारजा, अलयेन, कुवेत, कतार, मस्कत आदी ठिकाणचे हजारो लोक या व्याख्यानांना उपस्थित होते. डॉ.आंबेडकरांच्या विविध पैलूबरील भाषणांच्या सी.डी.काढून त्यांचा अनेक देशांमध्ये प्रसार करण्यात आला. डॉ.आंबेडकर विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तळमळीने प्रेरित होऊन कार्यक्रम आयोजित करणारे आयु-डॉ.वसंत म्हस्के, आयु-रत्माकर दंडवते, प्रा.काशीकृष्णा, आयु.संदीप कर्डक, आयु.महेद्र रोकडे, आयु.मनिष गेडाम, आयु.धीरज गोंडाणे, आयु.सोपान शिवभक्त, आयु.मारुती खारगे आणि त्यांच्या सर्व सहका-यांचा ऋणनिर्देश केला
पाहिजे.
बामसेफ हे आंबेडकरी विचारांच्या प्रचार प्रसारामध्ये अग्रेसर असलेले संघटन आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, आयु.वामन मेश्राम, बी.डी.बोरकर, मुंबईचे डॉ. विनायक काळे आदींचे या कामाकडे बारकाईने लक्ष असते. मुंबई फ्रेंड सर्कल, बहुजन साहित्य संस्कृती कला अकादमी आणि भवतु सब्ब मंगलम् या तीन कृतिशिल युवक गटांचे डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ.राहुल गजभिये, आयु.सचिन शेंडे, आयु-जयंत रामटेके, डॉ.अनूप ताकसांडे, डॉ.अमोल सूर्यवंशी, डॉ.राहुल पाटील, आयुःशुद्धोधन आहेर, अनिल पवार, सुनिल खोब्रागडे, शातू डोळस, जितेंद्र निकाळजे, आयु.माणिक भोंगडे, धोंडिराम लोखंडे,मुलुंड, एच.आर.गवइ,नेरुळ व त्यांचे कुटुंबिय यांच्याविषयीची कृतज्ञता शब्दात व्यक्त करणे कठीण [आहे. ]
समितीचे कार्यालय मुंबईत आणि आमचे घर पुण्यात असल्याने तसेच व्याख्याने, शोधदौरे यांच्यासाठीही सतत फिरावे लागत असल्याने घरच्यांना कमी वेळ देता येतो. त्यात भर म्हणजे वर्षानुवर्ष वेतन न मिळणे यामुळे होणारा त्रास कूरकूर न करता सोसणाऱ्या कुटुंबियांबद्दलची (पत्नी संगिता, मुलगी प्रमिती, आई सोनाबाई) कृतज्ञता कोणत्या शब्दात व्यक्त करणार ?
(एकोणवीस)