जयसिंगपूर येथील बुद्धविहार हा दक्षिण भारतातील बोध्द् चळवळीचे महत्त्वपूर्ण केंद्र होय. कालवश भू.आ.कांबळे आणि जयसिंगपूरच्या उपासकांच्यासमवेत आम्ही
आदरणीय भदंत उपगुप्त महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली १ महिन्याची संपूर्ण बौद्ध
धम्मयात्रा केली. आयुष्यभर पुरणारी उर्जा या अभ्यासातून व अनुभवातून आम्हाला मिळाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणा-या संघामध्ये समाविष्ट असलेले भदंत जी.प्रज्ञानंद यांच्या भेटीत त्यांनी डॉ.आंबेडकर लेखन आणि भाषणे मालिकेची आस्थेबाईकपणे चौकशी केली. पूज्य भंतेजीनी समितीच्या कार्यालयाला भेट दिली व समितीच्या कार्याची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य मागासवगीय विद्युत कर्मचारी संघटनचे आयु.एस्.पी.कांबळे, जे.जे.हॉस्पिटलचे नेत्रशल्य विशारद डॉ.तात्याबा लहाने आणि सुगावा प्रकाशनाचे प्रा.विलास बाघ यांचे अमोल मार्गदर्शन समितीच्या कामांना बळ देणारे ठरते.
समितीच्या कामांसाठी पुढील मान्यवरांनी आम्हाला लक्षणीय मदत केलेली आहे. सर्वश्री,ना.विलासराव देशमुख (मुख्यमंत्री), ना.सुशिलकुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री ब राज्यपाल, आंध्रप्रदेश), ना. आर.आर.पाटील (उपमुख्यमंत्री), ना.छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री), समितीचे पदसिध्द् अध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. दिलीप बळसे पाटील, राज्यमंत्री ना. सुरेश शेट्टी, सामाजिक न्याय मंत्री ना. चंद्रकांत हांडोरे, विभागाच्या प्रधान
सचिव डाँ.जाँयस् शंकरन्,उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.एस्.एस्.पठाण,
सहसंचालक, प्रामुनव्वर अली, प्रशासन अधिकारी,आयु.वा.ग.भगत यांचे आम्ही कृतज्ञ आहोत.
मुख्यमंत्री कार्यालयाचे तत्कालीन सचिव,डॉ.संजय चहांदे, यशदाचे महासंचालक रत्नाकर गायकवाड, प्रा. रवीन्द्र चव्हाण, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे सहसचिव आयु.सुरेश गायकवाड, उपसचिव, आयु.जयंत गायकवाड,अपंग कल्याण विभागाचे आयुक्त आयु. आर. के. गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे सचिव भा.इ.नगराळे, मित्रवर्य प्रल्हाद जाधव (माहिती संचालक), सुरेश बांदीले, पोपट मलिकनेर, डॉ.अविनाश ढाकणे, श्री-संजीव जाधव, श्री.भोर, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी श्रीमती सोनलस्मित पाटील यांच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल.
समितीचे ज्येष्ठ सदस्य, खासदार दादासाहेब तथा रा-सु.गवई म्हणजे आमचे उर्जाकेंद्रच होय. समितीच्या कामांमध्ये संपूर्ण बुडून गेलेले आमचे मार्गदर्शक म्हणून आम्हो त्यांना मानतो. त्यांची पाठपुरावा करण्याची क्षमता अपूर्व आहे. या खंडाच्या निर्मितीत त्यांचे विशेष श्रेय आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. _
(वीस)