ब्राह्मण गृहस्थांचे पत्र - Page 465

- bor

परिशिष्ट-७

ब्राह्मण गृहस्थांचे पत्र

| अहमदाबाद ता. ३० एप्रिल १९२७

श्री. रा. रा. डॉ. आंबेडकर यांस,

अनेकोत्तम राम राम विनंति विशेष.

मुंबई टाईम्स या पत्रांतून महाड येथील शोचनीय प्रकार वाचून आम्हांस अत्यंत वाईट वाटलें. आम्ही येथें जें कांही शब्दाने दिग्दर्शित करित आहों त्यापेक्षां आमची अंतःकरणे कितीतरी विदग्ध झाली आहेत. पोकळ सहानुभूति दाखविणे हें आमचे उद्दिष्ट नसल्यानें, आपण या पत्राचा योग्य अर्थ घेऊन आपलें समाधान करून घ्यावें.

आम्हीं देखिल महाराष्ट्रीय हिंदु ब्राह्मण आहोंत ; आणि म्हणूनच आपणावर व आपल्या सारख्या ज्यांच्या ज्यांच्यावर महाड येथील प्रसंग गुदरला आहे, त्यांना विनंती करीत आहोंत की, जरी आज अहंमन्य अशा उच्चवर्णीय हिंदूंनी आपला अपमान केला असला तरी; या प्रसंगाचा फायदा घेऊन मुसलमान लोकांनी पुढें केलेला प्रेमाचा हात-तो कोणत्याहि हेतूनें पुढें आला असला तरी-त्याचा स्वीकार करूं नये.

आम्हीं लोक विधर्मी अशा खिस्ती, पारशी अगर मुसलमान यांना जितका स्पृश्यतेचा अधिकार देत आहों तितका देखील दुर्दैवाने आमच्या धर्मबांधवास-की, ज्यांनी केवळ आमच्या समाजाकरितांच हलका धंदा पत्करिला आहे, त्यांना-देत नाही ; इतकेंच काय परंतु त्यांचा आम्हीं तिरस्कार करितों. हा केवळ मुर्खपणा होय.

आपण क्षमा करा. परमेश्वर आपल्या कार्यात आपणांस यश देईल !

कोणत्याही फळाच्या प्राप्तीकरितां कष्ट हे उचललेच पाहिजेत. आपणांस येथे वाजवीपेक्षां जास्त श्रम पडत आहेत हें आम्हांस कबूल आहे, परंतु तें कसेही असलें तरी या प्रसंगांत सांपडलों म्हणून कोणीही धर्मांतर करणार नाही अशी

आपण खबरदारी घेतली पाहिजे व आपण त्याप्रमाणे करीत असाल अशी आम्हास

आशा आहे.