परिशिष्ट-६
टिपणीसांचे पत्र
रा. रा. संपादक, बहिष्कृत भारत, यांस--
तारीख २० मार्च रोजीं महाड येथे अस्पृश्यांना स्पृश्यांनीं जी मारहाण केली त्यासंबंधी चौकशी करण्यासाठीं पुण्याहून हिंदु सभेच्या खर्चाने श्रीयुत माटे येथें आले होते असें बर्तमानपत्रावरून समज॑लें. श्रीयुत: माटे हे महाड येथें येणार असल्यांबद्दल'पहिल्या प्रथम त्यांचे मला पत्र आलें होतें ; परंतु येथें येऊनही त्यांनी माझी भेट घेतली नाही. तारीख .१२-५-२७ चे ' नवाकाळां ' तील पुण्यांचे बातमींपत्रावरून शिवाजी मंदिरांत झालेल्या त्यांचे व्याख्यानांत जी त्यांनी अनेक चुकीची विधाने केली त्यांत खुद्द माझेविषयीही एक चुकीचें विधान केलें आहे. तें असें “ प्रेसिडेंट टिपणीस PR wea लोकांनी मार खाल्लेल्या अस्पृश्यांना औषधपाणी देवविलें आहें. " हें माटे मास्तरांचे म्हणणें खरें नाही. प्रतिकूल परिस्थितींत सांपडल्यामुळें मला तर माझे दलित बांधवांना मारहाण झाली त्यावेळी कोणतीही मदत करता आली नाही. या एकाच गोष्टीवरून माटे यांनी मिळविलेली माहिती कशी चुकीची आहे हें समजून येईल
अस्पृश्य बाईला मारलें ही गोष्ट खोटी आहे असेंहीं माटे म्हणतात. परंतु ज्या भानुदास चांभाराचे बायकोला मार बसला आहे तो माझेसमोर डॉक्टर आंबेडकर यांना म्हणत होता कीं, “मला महाडच्या पेठेत धंदा करावयाचा आहे, माझे बायको पोराला जरी मारहाण झाली आहे तरी त्यांना मी कोर्टाकचेरीत येऊं देणार नाही. या पुढें मला सशस्त्र पोलीस मिळेल अशी व्यवस्था करा. असो. माटे . यांनी एकांगी व अर्धवट अशी चौकशी करून पुणें येथील सभेंत कांही भरमसाट खोटी विधानें या महाड प्रकरणासंबंधी केली आहेत व इतर झालेल्या मारहाणीचा दोष अस्पृश्यांवर टाकून स्पृश्यांवर व त्यांतले त्यांत पांढरपेशांवर आलेल्या दोषांतून त्यांना बचावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीयुत माटे जर मला येथें भेटले असतें तर मी त्यांना जरुर ती मदत केली असती व त्यामुळे महाडचा खरा प्रकारही त्यांना समजून आला असता व तो त्यांना खऱ्या स्वरुपांत जनतेपुढे मांडता आला असता.
महाड, ता. १०-५-२७ आपला,
सु. गो. टिपणीस.
न MN PIER i ici महाड Ls al रे नि. i
Pa भारत, ता. २० मे १९२७.