पेशवाई - Page 467

परिशिष्ट-८
पेशवाई

“ छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जे पेशवे म्हणून स्वतंत्र रीतींने प्रसिद्धीस आले ते एकंदर सात पेशवे होत. त्यांची नांवें येणेप्रमाणे :-

(१) बाळाजी विश्वनाथ इ. स. १७१३ ते १७२०

(२) बाजीराव बल्लाळ इ. स. १७२० ते १७४०

(३) बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब इ. स. १७४० ते १७६१

(४) माधवराव पहिला इ. स. १७६१ ते १७७२

(५) नारायणराव इ. स. १७७२ ते १७७३

*गंगाबाई (नारायणरावची बायको) छइ. स. १७७३ ते १७७४

(६) सवाई माधवराव इ. स. १७७४ ते १७९५

(७) दु. बाजीराव इ. स. १७९५ ते १८१८“ १ पेशवेकालीन अस्पृश्यांचे जीवन :

'* ब्राह्मणांच्या हाती राजकीय व धार्मिक सत्ता आल्यानंतर त्यांनी सवर्ण हिंदूंचा पेशवाईत किती छळ केला, हे दाखविण्याचा उद्देश एवढाच की, ब्राह्मणांनी अस्पृश्यांचा किती अनन्वित छळ केला असेल, हे त्यावरून वाचकांनी जाणावे. अस्पृश्यांच्या छळाची संपूर्ण ऐतिहासिक लेखी माहिती मिळणे अशक्य आहे. कारण त्यांची नोंद कोण ठेवणार ? नोंद ठेवण्याचे यंत्र व तंत्र ब्राह्मणांच्या हातात आणि ब्राह्मण अस्पृश्यांना पशूपेक्षाहि हीन समजत होते. पशूंच्या छळांची नोंद नाही, मग पशूपेक्षा हीन लोकांच्या छळांची नोंद कोण ठेवतो ? तरी पण त्यावेळी जे छळांचे प्रकार अस्तित्वात होते त्याची वाच्यता व चर्चा दर पिढीत होणे अपरिहार्य होते. काही युरोपियन लोकांनी हे छळ पाहिलेले होते. अस्पृश्यांच्या या छळांची नोंद युरोपियन लेखकांनी केली व तिचा उपयोग हिंदी लेखक करू लागले. महार यांनी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजण्याच्या काळात फिरू नये ; कारण [त्यांच्या ] सावलीचा स्पृश्यांना विटाळ होईल. असा पेशवाईत दंडक होता, याची नोंद रसेल यांनी

१3. लाड, पृ. ५,