पेशवाई - Page 468

४२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपल्या ग्रंथात (The Tribes and Castes of Central Provinces, London, 1916, P. 189, Vol.4) केलेली आहे. या बाबतीत डॉ. घुर्ये यांनी तीच माहिती सविस्तर दिलेली आहे ती अशी-

“ In the Maratha Country a Mahar-one of the untouchables-might not spit on the road lest a pure-caste Hindu be polluted by touching it with his foot, but had to carry an earthen pot, hung from his neck, in which to spit. Further he had to

drag a thorny branch with him to wipe out his foot-prints and to lie at a distance

prostrate on the ground if a Brahmin passed by, so that his foul shadow might not

defile the holy Brahmin. ” (Caste and Race in India, Pp. 72-73) °!

डॉ. द. पु. खानापूरकर यांनी महारांसंबंधी जी मते प्रदर्शित केलेली आहेत ती अशी :--

“ सर्व अस्पृश्यांत हिंदुसमाजाकडून जास्तीत जास्त हाल व अपमान झाले असतील तर ते महारांचे. पेशवाईच्या वेळेस यांच्यावर गळ्यात मडके बांधून फिरण्याची सक्ती होती व गावात जर ब्राह्मण समोर दिसला तर तो यांच्या छायेने अपवित्र होऊ नये म्हणून त्यांना जमिनीवर पालथे पडण्याचा हुकूम होता. इतकेच नव्हेतर जमिनीवर पडलेल्या यांच्या पावलांच्या खुणांनी ब्राह्मण अपवित्र होऊ नये म्हणून त्यांना काटेरी झुडूप स्वतःच्या मागे घेऊन हिंडावे लागे व त्या झुडुपाने आपल्या पावलांचा माग पुसून टाकावा लागे. महारांची दुसरी नावे अतिशुद्र व भुमिपुत्र (भूझ्या हे ओरिसामधील नाव आहे. त्याचा अर्थ पण भूमीचा मुलगा असाच होतो. हे साधर्म्य लक्षात घेण्याजोगे आहे.) या दोन्ही नावांवरून ते आदिवासी असावेत व आर्यांनी त्यांना आपणात मिसळल्यानंतर कायमचेच अस्पृश्य बनवले असावे. एन्थोवनच्या मताप्रमाणे यांच्यात जे निरनिराळे पन्नास विभाग आहेत ते सर्व आदिवासी जमातीचे भाग असावेत व ते भाग आर्यांच्या आक्रमणानंतर एकत्र होऊन आपणास महार या नावाने ओळखू लागले असावेत. कदाचित महाराष्ट्र हे नावही महारांवरून पडले असण्याचा संभव आहे. आजही हे आदिवासी जमातींच्या पुढाऱ्यांप्रमाणे आपणास नाक म्हणजे नाईक म्हणवतात. काहींच्या मते नाक हा नाग या शब्दाचा अपभ्रंश असून, वेदपुराणात नाग नावाचे जे लोक वर्णन केले आहेत ते हेच असावेत” (पा. ११८-१२९)-नवा महाराष्ट्र या पुस्तकातील ' दलित समाज ' हा लेख.?

“कोकणातील महार यांचे एकेकाळी स्वतंत्र राज्य होते. त्यांना आर्यादी लोकांनी जिंकून त्यांच्यावर इतक्या शरणागतीच्या अटी लादल्या की, त्यांना

१ : खैरमोडे, खंड ५ वा ; पृ. २३५-२३६.

२: उद्धृत, खैरमोडे, खंड १ ला ; पृ. ५.