परिशिष्ट-१२
रा. माट्यांचा खोटेपणा
वि. वि. बहिष्कृत भारतकर्ते यांसी :-
तारीख ३ मे १९२७ रोजीं 'केसरी' मध्यें व 'नवाकाठ' मध्यें राजश्री माटे यांनीं सभा भरवून महाडसंबंधानें जी माहिती प्रसिद्ध केली आहे ती अगदी चुकीची आहे. राजश्री माटे यांनी आमच्या कुटुंबास मारलें नाहीं अशी जी माहिती प्रसिद्ध केली आहे ती खोटी आहे, आणि त्यांत जी माहिती प्रसिद्ध केली आहे ती रा. माटे यांनी सिद्ध करून दिली पाहिजे नाहीं तर त्यांच्यावर विनाकारण माझी व कुटुंबाची बेअब्रु केल्याबद्दल कायद्याप्रमाणे इलाज केला जाईल.
तारीख ८ मे १९२७ च्या 'ज्ञानप्रकाश' च्या अंकांत रा. पी. एन. राजभोज व रा. शांताराम पोतनीस यांनी जे लिहिलें तें अगदीं बरोबर आहे. वाचकांनीं गैरसमज करून घेऊ नये. हे आमचे अस्पृश्यतानिवारक म्हणवून घेणारे पुढारी पहा कशी आपली पगडी फिरवितात ! हें वरील गोष्टीवरून स्पष्ट दिसतें. उत्तर दिल्यास मीं जास्त खुलासा करीन.
आ.
भानुदास गुंडोराव कांबळे
सातारा प्रतापगड
पत्रव्यवहार : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.
डब्ल्यू-२०७३-२८ ब