परिशिष्ट-१३
पुणे
मातंगपरिषदेची दुसरी बाजु
मे. रा. रा. दीनबंधु पत्राचे संपादक यांस :-क्. सा. न. वि. वि. माझ्या पत्रास आपल्या येत्या अंकांत अवश्य स्थळ द्याल अशी आशा आहे. ता. ५-७-२७ रविवार दिवशीं मातंगपरिषद् भरविण्यात आली आणि त्या ठिकाणी रा. रा. भोपटकर हे अध्यक्षस्थानी विराजमान झाले. त्या ठिकाणीं आमच्या नांवावर पोट भरणारे वायदंडे हे ACTA वतीनें चालून आमचा मातंगसमाज रसातळास जावा असा एक त्यांचा अंदाज दिसत आहे. तरी पण आमच्या मातंग वीरांनीं थोडक्यांत सावध राहून लोकांच्या भरंवशावर न रहातां, आपल्या पायावर उभे रहावें हें आद्य कर्तव्य होय.
वरील नमूद केलेली परिषद ही निव्वळ पाँलिशीवाईक होती असें त्यांच्या कर्तबगारीवरून उघड दिसून आले ; बाहेर गांवांहून आलेल्या THAT बोलण्याची परवानगी न मिळतां, भटाच्या वतीनें जे चालणारे त्यांनाच मात्र बोलण्याची परवानगी असे व इतरांस दहा किंवा बारा मिनिटें, अशी अध्यक्षांनी सूचना दिली होती. तरी पण जे कोणी चाहाते वि. डी. वायदंडे, रा. सकट यांना आमच्या मातंग सामाजांत, फुकटही विचारीत नाहींत, यांना जे कांहीं मायाच्या वतीनें फांटे फुटले ते निव्वळ बेगडी पॉलिशीचे असून मातंग लोकांना काळिमा फांसण्या जोगेच होत त्यावरूनच रा. रा. हिमतबहादूर सिताराम बाबाजी लांडगे यांनीं ठराव करून व त्यांच ठरावास अनुसरून एक गुपित गोष्ट सर्व मातंगांच्या निदर्शनास आणिलीच आहे. ती येणेप्रमाणे :-वरिष्ठांनीं आपल्या मातंग लोकांच्या वतीचें जीं जीं कार्ये साधून घ्यावयाची, ती तीं कार्ये मातंगांच्या वतीची साधण्यांत येतील अशी जीं भावनेचीं व नवलाचीं कौलें घालूं पहातात, त्यांची शाकारणी त्या नवलाच्या कालानें केली, तरी आपली जीं कांही गळकी घरें थोडी बहुत आहेत, त्यांहीपेक्षां जास्त गळतीं होऊन त्या गारठ्याच्या योगानें आपणांस निमोनिया रोग होऊन क्षयरोगावर गेल्यास डॉक्टर सुद्धां इलाज करावयास भीत असतात. तर आपण लोकांवर न विशवासतां आपल्या Set तीं शाकारून झाल्यास बरी म्हणजे असलेलें गळीत खात्रीनें बंद झाल्याशिवाय राहणार नाही.