परिशिष्ट-३७
कॅथरीन मेयो आणि ' मदर इंडिया ग्रंथ
कॅथरीन मेयो या अमेरिकन बाईचा जन्म अमेरिकेतील पेन्सिलव्हानिया राज्यात
Ra येथे १८६७ साली झाला. मॅसॅच्युसेटस राज्यातील बोस्टन आणि केंब्रिज
येथे अत्यंत उच्चभ्रू शाळांत तिचे शिक्षण झाले. १८९० पासून तिचे लेख, कथा विविध मासिकातून व वृत्तपत्रातून येण्यास सुरुवात झाली. तिने १९२५ साली हिंदुस्थानला भेट दिली होती.
मिस कॅथरीन मेयोने लिहिलेले ' मदर इंडिया ' हे पुस्तक १९२७ च्या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच सायमन कमिशनची नेमणूक जाहीर होण्यापूर्वी जवळजवळ सहा महिने अगोदर प्रसिद्ध झाले. या पुस्तकाने त्यावेळी प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याबरोबर भारतीयांनी ताबडतोब त्याचा निषेध करण्यास सुरुवात केली. या पुस्तकातील टीकेला उत्तर देण्यासाठी एकामागून एक भराभर ग्रंथ प्रसिद्ध झाले. ते असे, मिस मेयोज ' मदर इंडिया ' ए रिजॉइंडर- के. नटराजन (मद्रास १९२८), फादर इंडिया-सी. एस्. रंगा अय्यर (लंडन १९२८); सिस्टर इंडिया-वर्ल्ड सिटिझन (मुंबई १९२८), अनहँपी इंडिया-लाला लजपतराय (कलकत्ता १९२८), ए सन ऑफ मदर इंडिया आन्सर्स-धनगोपाला मुखर्जी (न्यूयॉक १९२८), इंडिया-इटस् कॅरेक्टर ए रिप्लाय टू ' मदर इंडिया '--जे. ए. चॅपमन (ऑक्सफर्ड १९२८) व अन इंग्लिशमन डिफेन्डस् मदर इंडिया-ए कंप्लीट रिप्लाय दू मदर इंडिया-अर्नेस्ट FE (मद्रास १९२९).
“ मदर इंडिया ' या पुस्तकाच्या सहा आवृत्या निघाल्या आहेत. आपले हे पुस्तक समर्पित करताना लेखिका म्हणते,
“To the peoples of India and to that Indian Field-Labourer who, once, by an act of humanity saved my life. ”
या पुस्तकातील विचारावर जे वरीलप्रमाणे टीकेचे वादळ उठले त्याचे मूळ कारण तिने त्यात दर्शविलेले स्वतःचे अवलोकन होय.
Leaving the ancient roots of things, and coming down to the year A. D. 1926, we find the orthodox Hindu rule as to Untouchables to be roughly this :