जोतीराव फुले - Page 549

जोतीराव फुले ५०३

सत्यशोधक समाजाच्या ध्येयानुसार शूद्रास सदुपदेश व विद्याद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावटी व कार्यसाधक ग्रंथापासून त्यांना मुक्त करण्याकरिता जीवनविषयक सर्व क्षेत्रांशी संबंधीत अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक संशोधन करून वास्तविक स्थिती आणि शुद्रादिअतिशूद्रांनी कसे आपले कृतीशील जीवन व्यतीत करावे याबाबत प्रबोधनात्मक मांडणी केली आहे. त्यांनी ब्राह्मणी धर्माचा त्याग करून सार्वजनिक सत्य धर्माचा अंगिकार करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे आदर्श व्यक्ति, समाज आणि राष्ट्र घडविण्यासाठी आवश्यक जीवन मूल्यांवर आधारित अमोल ठेवा आहे. या पुस्तकांत जी 33 सत्यवर्तन करणाऱ्यांविषयी नियम दिले आहेत ते बौद्ध धम्मातील पायाभूत सिद्धांतावर आधारित आहेत. अशा या महापुरूषाचा मृत्यू “शके १८१२ कार्तिक शु.।। १५, तारीख २८ नोव्हेंबर १८९० इ. स. रोजी बुधवारी व पौर्णिमेस झाला. त्यांचा जन्मही बुधवारी व पौर्णिमेसच झाला.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांना आपले गुरू मानताना म्हणतात, माझे तिसरे गुरू म्हणजे जोतीबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू तेच होत. शिंपी, कुंभार, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले

आणि शिकविले ....... कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतीबांच्याच

मार्गानी जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण जोतीबांचा मार्ग सोडणार नाही.” २ जर डॉ. आंबेडकरांनी म. फुल्यांना गुरू म्हणून घोषीत केले नसते तर आज त्यांच्या जीवन आणि कार्याला जे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. कदाचित, ते प्राप्त झाले नसते, काळाच्या ओघात नष्ट झाले असते.

१: संदर्भ ग्रंथ (१) नरके, पृ. १७८-१८७ आणि (२) म. फुले समग्र वाङ्मय, सुधारित पाचवी

आवृती.

२: खंड १८, भाग ३, पृ. ४०२.