५४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तर सततच असतात. हे सर्व असताना आज स्वराज्य आहे हे कसे मानावे ? आम्हाला असे स्वराज्य पाहिजे जिथे कुणी शूद्र असणार नाही. कसल्याही प्रकारचे शोषण असणार नाही. आम्हाला हवे आहे ते असे स्वराज्य.
*जे स्वतः स्वाभिमान, अस्मिता, प्रतिष्ठा यांची पर्वा करत नाही ते राष्ट्रवादाच्या कल्पनेला बळी पडतात. देश खराखुरा स्वतंत्र व्हायचा असेल तर धर्म, सत्ता व सरकार यात क्रांतीकारी बदल व्हायला पाहिजे. ही दृष्टी असल्याशिवाय राजकारणावरील टीका उपयोगाची नाही. आंधळे हल्ले आपल्याला ध्येयाप्रत नेत नाहीत.”
१ : चौधरी, पेरियर ई. व्ही. रामस्वामी :
जीवन व विचार पृ. १२-१३.
डब्ल्यू-२०७३-३५ ब