पेरियार रामास्वामी नायकर - Page 589

पेरियार रामास्वामी नायकर ५४३

ऐकू शकेल. मी म्हणतो हिंदुत्व ही एक प्रचंड ढोंगबाजी आहे. याउप्पर आम्ही हिंदुधर्मा बरोबर मुर्ख बनून राहू इच्छित नाही. या धर्माने आजपावेतो आमचे खूप काही नासवले आहे. त्याने आमचा बुद्धीनाश केला आहे. आमचे सत्व हरण केले आहे.

*या धर्माने आमचे भवितव्य बुडवले, आम्हाला हजारो प्रकारात विभाजित केले. नीच व श्रेष्ठ ठरवण्या करता धर्माची गरज आहे का ? शत्रुचा द्वेष निर्माण करणारा धर्म आम्हाला नको आहे. अर्थशून्य, निरूपयोगी आणि लोकांच्या प्रगतीच्या आड येणारा असे हिंदुधर्माचे स्वरूप असतांना आम्ही त्यात का राहावे? वेडगळपणा, अनैतिक, ढोंगबाजी यांची चलती होती त्याकाळी हिंदू धर्माची उत्पति झाली आहे. आम्ही आज त्या पाशवी काळात नाही. आणित्या धर्माला चिकटून राहू शकत नाही. माणसाला धर्माची गरजच असेलतर त्यात आधुनिक युगाला साजेशी सुधारणा करायला हवी. धर्म ही आवश्यक बाब नाही. माणूस स्वतः अनुभव व शहाणपणाच्या आधारावर आपले जीवण बनवू शकतो. हिंदू धर्म ही एक विकृती आहे. तो कुठल्याही अर्थाने आपल्या उपयोगाचा नाही.

“प्रत्येक जातीला संख्या प्रमाणात राखीव जागा

*मला वाटते प्रत्येक जाती-जमातीला तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा द्यायला हव्यात. एखादी जात तिच्या लोकसंख्या प्रमाणापेक्षा १ टक्का देखील जास्त जागा घेत असेल तर सरकारने अशा वेळी कारवाई करायला हवी. हा एका जातीने दुसर्‍या जातीच्या अधिकारावर अधिक्रमण करण्याचा प्रकार आहे. या ठिकाणी कायदा आड यायला हवा. नाहीतर पुढारलेले

आणखी पुढे जातील व मागास आणखी मागे जातील. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांना

जास्त जागा मिळायला लागल्या आहेत. त्यांची झपाट्याने प्रगती होते आहे. इंग्रजाच्या काळी आय.सी.एस. परीक्षा लंडणमध्ये होई. सर्व खर्च सरकार करत असे आणि त्यामुळे ब्राह्मण सहज पास होत.

०८७ टक्के जनता वंचित ठेवणे ही लोकशाही आहे का? ३ टक्के लोकांचा एकाधिकार असणे हा न्याय आहे का? आपल्या हक्कासाठी झगडणे चूक कसे? आम्हाला न्याय हवा इज्जत हवी आहे. आमचा वाटा हवा आहे. आम्ही हे सर्व मागतो तेव्हा कुणाला राग येण्याचे कारण [काय ] [? ]

आम्हाला अंगभर कपडा मिळत नाही. राहायला घर नाही. शाळांची वानवा आहे. जगण्याची निश्‍चिती नाही. चोऱ्या, दरोडे, खून, कलम १४४ हे

डब्ल्यू-२०७३-३५ अ