व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 593

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची

अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा :--मुंबई येथे सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ मार्च १९१८ रोजी अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद भरली होती. तीत सभेचा मुख्य ठराव बॅ. जयकर यानी मांडला होता. तो असा--'निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढे ताबडतोब काढून टाकण्यात यावी आणि या कार्यासाठी प्रत्येक प्रांतातील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढाऱ्यांनी एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्ट वर्गास शाळा, दवाखाने, न्यायकचेऱ्या, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सर्व सार्वजनिक संस्थांत तसेच विहिरी, तळे, म्युनिसिपालिटीचे नळ अशा सार्वजनिक पाणवठ्यांस, व्यवहाराची व करमणुकीची ठिकाणे व देवालया सारख्या सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रतिबंध न राहता पूर्ण मोकळीक करून द्यावी असे ह्या परिषदेचे मत आहे.' ह्या परिषदेला लो. टिळकसुद्धा उपस्थित होते. परिषदेतील ह्या जाहीरनाम्याचा मसुदा नंतर तयार करण्यात आला व त्याच्या शेकडो छापील प्रती प्रांतोप्रांती पुढाऱ्यांकडे सह्यांसाठी पाठविण्यात आल्या. त्या मसुद्याखाली जाड्या टाईपात अशी टीप होती की, “ मी खाली सही करणार ठरावातल्या अटी स्वतः अक्षरशः पाळीन आणी मी स्वतः हरप्रयत्न करून दुसऱ्याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्न सतत करीन.” ह्या जाहीरनाम्यावर सही करण्यास लो. टिळकांनी नकार दर्शविला [होता. ]

अस्पृश्यतेविरूद्ध ठराव :--१९१७ साली मिसेस्‌ अॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे वार्षिक अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात मद्रासचे मि. जी. ए. नटेसन यांनी एक ठराव मांडला होता तोच हा अस्पृश्यतेबद्दलचा ठराव होय. तो असा--” This congress urges upon the people of India the necessity, justice and righteousness of removing all disabilities imposed by custom upon the Depressed Classes the disabilities being of a most vexatious and oppressive character, . subjecting those classes to considerable hardship and inconvenience.” या ठरावाला मुंबईचे भुलाभाई देसाई, मलाबारचे रामा अय्यर आणि दिल्लीचे आसफ अली यांनी पाठिंबा दिला होता.

आगरकर, गोपाळराव गणेश (१८५६-१८९५) :--आधुनिक महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक. नामवंत मराठी निबंधकार. दारिक्र्याशी टक्कर देऊन १८८० साली एम्‌.ए. झाले व चिपळूणकरांनी काढलेल्या न्यू इग्लिश स्कूलात प्रवेश घेऊन स्वदेश सेवेची दीक्षा घेतली. केसरी-मराठा वृत्तपत्रे १८८१ मध्ये सुरू झाल्यावर