MR/Khand_20 - Page 14

प्रथा आहे. डॉ.आंबेडकरांच्या ग्रंथांची आमची आवृत्ती १५ ते ३० हजार प्रतींची असते. सर्वश्री,डॉ.बी.जी.कुंटे, म.भि.चिटणीस, पी.टी.बोराळे, एस्‌.एस्‌.रेगे, भालचंद्र फडके आणि वसंत मून यांच्या परिश्रमातून प्रारंभीचे खंड प्रकाशित झाले. त्यांना

अन्य अभ्यासकांचेही सहाय्य लाभले. वसंतराव मून यांच्या निधनानंतर त्यांच्या संशोधकीय बैठकीत तयार झालेले हरी नरके या तरुण अभ्यासकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी समर्पित वृत्तीने हया फुले आंबेडकरी साहित्य प्रकल्पासाठी स्वतःला वाहून घेतले. परिणामी गेल्या ३ वर्षात खंड १७ व १८ चे सहा भाग आणि आता खंड १९ ब Yo वाचकांना उपलब्ध होत आहेत. खासदार रा.सु.गवई आणि आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे या ग्रंथ प्रकल्पाचा वारंवार पाठपुरावा करीत असतात. समितीचे अध्यक्ष, सर्व मान्यवर सदस्य आणि संपादक यांच्या मेहनतीमुळे हे खंड वाचकांना उपलब्ध होत आहेत. वाचक याही ग्रंथाचे प्रचंड स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो.

विलासराव देशमुख

मुख्यमंत्री

(दहा)