MR/Khand_20 - Page 15

मनोगत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक महान राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या महापरिनिर्वाणाला २० वर्षे झाली असताना त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९७६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना केली. डॉ.आंबेडकरांचे वारस (पत्नी डो.सविता आंबेडकर आणि पुत्र श्री.यशवंत आंबेडकर) यांच्याकडून साहित्य प्रकाशनाचे अधिकार घेऊन १९७९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड- १ प्रकाशित केला गेला. आजवर या २९ वर्षात समितीने बाबासाहेबांच्या साहित्याचे १८ खंड आणि संदर्भ साहित्याचे २ खंड प्रकाशित केले. चौदावा खंड २ भागात होता तर खंड सतरा आणि अठरा प्रत्येको ३ भागांचे होते. अशाप्रकारे एकुण २५ ग्रंथ प्रकाशित झाले. या सर्वच ग्रंथांवर वाचकांच्या उडया पडल्या. एवढी तुफान लोकप्रियता शासकीय प्रकाशनांना क्वचितच मिळत असते.

नागपूरला खंड अठराच्या प्रकाशन समारंभाला मी उपस्थित होतो. त्यावेळी कार्यक्रमाच्या हॉलवर पहाटेपासून लोकांनी रांगा लावलेल्या मी बघितल्या. विक्रीला ठेवलेल्या सगळया प्रती हातोहात संपल्या. असे दृश्य मी प्रथमच पाहात [होतो. ] बसंत मून यांच्या निधनानंतर हे काम थांबू नये यासाठी आम्ही महात्मा फुले साहित्याच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात नाबाजलेले तरुण विद्वान हरी नरके यांच्याकडे बाबासाहेबांच्या साहित्याचे काम सोपवले. त्यांनीही टेल्कोसारख्या नामवंत कंपनीतील आपली मोठया अधिकार पदाची नोकरी सोडून या कामाला पूर्ण बेळ वाहून घेतले. फुले-आंबेडकर प्रकाशन समित्यांना शासनाने आजवर हंगामी स्वरुप दिले असल्याने दरवर्षी समित्यांना मुदतवाढ द्यावी [लागते. ] [या ] [किचकट ] प्रक्रियेत जाणारा वेळ आणि होणारी दमछाक [यांच्यामुळे ] [संशोधन-प्रकाशन ] [कार्याला ]

खीळ बसते. हे सारे सतत चालणारे काम [आहे. ] [त्यामुळे ] [डॉ.आंबेडकर ] [चरित्र ]

साधने प्रकाशन समितीचे हंगामी स्वरुप [संपवून ] [ती ] [कायमस्वरुपी ] [करण्यात ] [यावी ] ही मागणी करुन तिचा पाठपुरावा [श्री.हरी ] [नरके ] [यांनी ] [केला. ] [त्याला ] [यश ] [आले ] असून शासनाने आता डॉ.आंबेडकर [आणि ] [महात्मा ] [फुले ] [यांच्या ] [साहित्याचे ] [प्रकाशन ] करणा-या दोन्ही समित्यांचे कायमस्वरुपी [फौंडेशनमध्ये ] [रुपांतर ] [करण्याचे ] [ठरवले ] आहे. गेले दोन वर्षे अनेक कारणांनी प्रलंबित [राहिलेल्या ] [वा ] [मुद्दयाला ] [आम्ही ] आता गती दिली आहे.