खंड वीसच्या निमित्ताने
प्रिय वाचक,
सप्रेम जयभोम!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या स्थापनेला नुकतीच २९ वर्षे पूर्ण झाली. या काळात समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे एकुण २५ ग्रंथ प्रकाशित केले. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे मालिकेतील १८ खंड आणि संदर्भ साहित्य मालिकेतील दोन खंड यांचा समावेश आहे. चौदावा खंड दोन भागात, तर सतरावा ब अठरावा खंड प्रत्येकी ३ भागात होता. अशाप्रकारे प्रकाशित झालेल्या उपरोक्त २५ ग्रंथातील २१ इंग्रजी भाषेत तर ४ मराठी भाषेत होते. या सर्व ग्रंथांचे वाचकांनी प्रचंड स्वागत केले. देशाच्या कानाकोप-यातून आणि जगातल्या सुमारे १०० देशांतून या ग्रंथांना मागणी आली. येत आहे. आजवर १४ ग्रंथांच्या आवृत्त्या संपलेल्या आहेत. पहिल्या खंडाची तर दुसरीही आवृत्ती संपली असून चौथ्या खंडाची दुसरी आवृत्ती संपत आली आहे. भारतीय ग्रंथबिश्वामध्ये ग्रंथाची आवृत्ती काढताना सामान्यपणे १००० ते ३००० प्रतींची आवृत्ती काढली जाते. संदर्भ साहित्याच्या खंड एकची (मूकनायक व बहिष्कृत भारत) आवृत्ती २५००० प्रतींची होती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांच्या खंडाच्या (खंड १८) तिन्ही भागांच्या प्रत्येको तीस हजार प्रती आपण छापल्या होत्या. खंड १९ व २० मध्ये प्रत्येकी तीस हजार प्रतो आपण वाचकांना उपलब्ध करुन देत आहोत. या सा-या तपशिलावरुन आपल्या लक्षात येईल को आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बेस्ट सेलर आहेत. समितीने छापलेल्या पाच लाखांवर प्रतीची आजवर आपण विक्री केलेली आहे. हा वैचारिक ग्रंथांच्या विक्री विश्वातला अखिल भारतीय पातळीवरचा राष्ट्रीय उच्चांक होय.
या शासकीय प्रकल्पाद्वारे वाचकांना रास्त किंमतीत ग्रंथ उपलब्ध होत असले तरी हा तोटयात चालणारा उपक्रम नाही. यातून प्रचंड नफा मिळवण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू नसला तरीही आजवर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचा नफा महाराष्ट्र शासनाला यातून झालेला आहे हे नमूद केले पाहिजे. असे उपक्रम म्हणजे शासनावरचा बोजा, तोटयात चालणारी योजना अशी सर्वसाधारणपणे सार्वत्रिक समजूत असते.