MR/Khand_20 - Page 18

महाराष्ट्र शासनाला यातून मिळालेले श्रेय आणि या ग्रंथांमुळे झालेले सामाजिक प्रबोधन यांचे मूल्य हजारो कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिपादन सतराव्या खंडाच्या प्रकाशन समारंभात तत्कालीन उपमुख्यमंत्रो आयु.छगन भुजबळ यांनी केले होते. हे चिरकाल चालणारे काम असल्याने या समितीला कायमस्वरुपी मुदतवाढ देण्याची घोषणा याच समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री आयु.सुशिलकुमार शिंदे यांनी केली होती.

समारंभानंतर पंधरवडयातच समितीच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आयु. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. बैठकोला अर्थमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, मुख्य सचिब, वित्त सचिब असे सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. समितीला कायमस्वरुपी मुदतवाढ देण्यासाठी मंत्रीमंडळापुढे प्रस्ताब आणावा लागेल, तो एक आठवडयात आणू असे आश्वासन तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती चंद्रा अय्यंगार यांनी बैठकोत दिले होते. या घटनेला आता शंभर आठवडे उलटून गेले आहेत. अद्यापही हा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे आलेला नाही.

डॉ.बाबासाहेबांच्या साहित्याचे एकुण १४ खंड होतील असा समितीचा १९९० पर्यंत अंदाज होता. त्यानंतर मिळत गेलेल्या साहित्यामुळे ही खंड संख्या वाढून २१ पर्यंत जाणार असे दिसू लागले. हे २१ खंडांचे काम पूर्ण केल्यानंतर सदर समितीला मुदतवाढ देण्याची आवश्यकता राहणार नाही असा शासनाचा विचार असावा. दरम्यान समितीचे काम हाती घेतल्यानंतर आम्ही ही खंड संख्या २१ ऐवजी ४२ पर्यंत वाढणार असल्याचे सप्रमाण दाखवून दिले. याशिवाय यातील सवं इंग्रजी खंडांचे मराठीत भाषांतर करणे व मराठी खंडांचे इंग्रजीत भाषांतर करणे गरजेचे असून त्याचे ४२ खंड होतील. या समग्र साहित्याचे विषयवार संपादन करुन अभ्यासकांना ते उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

सध्या मजकूर हाताशी आला, तसा खंडामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच खंडात बाबासाहेबांचे विविध विषयांवरील विचार एकत्र दिले गेले आहेत. उदा.जातीव्यवस्था निर्मुलन, शिक्षण, स्त्रीपुरुष समता, आर्थिक बिचार, धर्म विषयक विचार अशा विविध विषयांवरील साहित्य एकत्र झालेले आहे. त्याची विषयवार आणि कालानुक्रमे विभागणी करुन त्याचे प्रकाशन करणे आवश्यक

(चोदा)