MR/Khand_20 - Page 22

त्यांना दिले नाही. आपण जाणकारांकडे हे काम सोपवले. त्यातल्या वसंत मून, प्र.श्री.नेरुरकर, आ.ना.पेडणेकर या अनुवादकांचे काम पूर्ण केल्यानंतर निधन झाले आहे. गौतम शिंदे, विजय कबीमंडन, प्रा.विनोद नंद, डि.वाय.हाडेकर, डॉ.आर.के.क्षीरसागर यांनी त्यांच्याकडील अनुबादाचे काम पूर्ण करुन आमच्याकडे सुपूर्द केले आहे. हे अनुवाद तज्ञांकडून तपासून घेतले असून त्यांची छपाई लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्यल्प मनुष्यबळ आणि उपरोक्त अडचणी यामुळे हे काम धीम्या गतीने चालू आहे. उर्वरित खंडांच्या अनुवादकांचे कामही लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. दरम्यान आवृत्त्या संपलेल्या ग्रंथांच्या प्रतीना खूप मागणी आहे. त्यांच्या नव्या आवृत्त्या काढण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. दुसऱ्या खंडाची दुसरी आवृत्ती लवकरच उपलब्ध होईल.

१९ व्या खंडात बाबासाहेबांच्या ८७ लेखांचा समावेश असून त्यातील समकालीन संदर्भ कळण्यासाठी आवश्यक ती ४७ परिशिष्टे सोबत दिली आहेत.

२० व्या खंडात बाबासाहेबांचे Wo लेख असून सोबत २६ परिशिष्टे दिलेली आहेत. बाबासाहेबांचे समग्र मराठी साहित्य वाचण्याकरिता अभ्यासकांनी खंड १८, १९ व २० एकत्रित वाचायला हवेत. अठराव्या खंडात आम्ही बाबासाहेबांची भाषणे छापतांना मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता व प्रबुध्द्‌ भारत यांमधील त्यांची भाषणे घेतली होती. त्यांची पुनरुक्ती टाळण्यासाठी या १९ व २० खंडांमध्ये या भाषणंचा समावेश केलेला नाही.

मराठी अनुवाद आम्ही लवकरात लवकर प्रकाशित करावेत यासाठी दिल्लीच्या डॉ.आंबेडकर फौडेशनचे प्रमुख आयु.किशोर बाबू यांनी आमच्याकडे आग्रह धरला. बहुजन समाज पक्षाचे नेते प्रा.सुरेश माने यांनी या कामी पाठपुरावा केला. संपादक

आणि पत्रकार मित्र आयु.कुमार केतकर (लोकसत्ता), आयु.अरुण खोरे (सकाळ),

आयु.उत्तम कांबळे (सकाळ), आयु.बबन कांबळे (सम्राट), आयु.बाबा गाडे (महानायक), विजय चोरमारे, बंधुराज लोणे, स. सो. खंडाळकर, यदु जोशी, विद्याधर दाते या सर्वांनी समितीबहदल लेखन करून समितीच्या कामांना गती दिली. `

(अठरा)