MR/Khand_20 - Page 21

कार्यालयाला तीन संगणक संच पुरवले. समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि खासदार दादासाहेब तथा रा.सु.गबई यांनीही आपल्या खासदारनिधीतून एक संगणक संच देण्याची घोषणा केली आहे.

उच्चशिक्षण मंत्री हे समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतांत. गेल्या दोन वर्षात आम्हाला पाच अध्यक्ष लाभले. प्रा.लक्ष्मण ढोबळे, प्रा.जयदत्त क्षीरसागर, आयु.मनोहर नाईक; आयु.सुरेश जैन आणि दिलिप बळसे पाटील याचे अध्यक्षतेखाली समितीने काही अडचणी सोडविण्यात यश मिळवले. समितीला मुदतवाढ देतांना पूर्वी “ यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, तीन महिन्यात उरलेले सर्व काम आटोपावे ” असे शासनादेश निघत असत. समितीचा जाहीर गौरव करणा-या मुख्यमंत्री ब उपमुख्यमंत्री यांच्यापुढे सतराव्या खंडाच्या प्रकाशन समारंभात आम्ही “ समितीचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवण्याची भिती ” जाहीरपणे व्यक्त केली होती. आयुःसुशिलकुमार शिंदे यांनी समिती कायमस्वरुपी करावी असे लेखी आदेश देऊन दोन वर्ष होत आली आहेत. शासन निर्णय प्रतिक्षाधीन आहे.

कालवश वसंत मून यांनी आयुष्यभर समितीचे काम केले. ते बारले तेव्हा त्यांना

दोन वाचा पगार मिळालेला नव्हता. आम्ही टेल्कोतील नोकरी सोडून या कामासाठी पूर्णवेळ द्यायला लागल्यानंतर आम्हाला पहिले वेतन मिळाले ते २७ महिन्यानंतर

आणि दुसरे त्यानंतर एक वर्षाने ! समितीकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत

याची आम्हाला जाणीव आहे. मराठी अनुवाद लवकरात लवकर प्रकाशित व्हावेत असा तगादा लोकांकडून वारंवार येत असतो. त्यांना हया अडचणींची काहीही कल्पना नसते. महाराष्ट्र शासनाने माहितीच्या अधिकाराचा कायदा पास केला आहे. फुले आंबेडकरी जनतेला आमची ही सद्यःस्थिती माहित करुन घेण्याचा अधिकार आहे अशी आमची नग्न धारणा आहे. त्यामुळे गैरसमज होण्याचे तरी टळेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात भारत सरकांरने तत्कालीन, पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या पुढाकाराने दिल्लीत डॉ.आंबेडकर फौंडेशनची स्थापना केली. दरवर्षी या फौंडेशनला रु.२०० कोटींचा निधी दिला जातो. त्यांनी आपल्याकडून हिंदी, बंगाली, तेलगू, गुजराथी अशा प्रमुख भारतीय भाषातील

अनुवादाचे काम मागून घेतले आहे. आजवर १३ भाषांतील अनुवादाचे खंड प्रकाशित

झाले आहेत. मराठीचे काम आपणच चांगले करु शकू या हेतूने आपणं हे काम

(सतरा)

बाय ६४१- २