MR/Khand_20 - Page 24

भदंत जी.प्रज्ञानंद यांच्या भेटीत त्यांनी डॉ.आंबेडकर लेखन आणि भाषणे मालिकेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पूज्य भंतेजीनी समितीच्या कार्यालयाला भेट दिली ब समितीच्या कार्याची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य मागासवगीय विद्युत कर्मचारी संघटनचे आयु.एस्‌.पी-कांबळे, जे.जे.हॉस्मिटलचे नेत्रशल्य विशारद डॉ.तात्याबा लहाने आणि सुगावा प्रकाशनाचे प्रा.विलास वाघ'यांचे अमोल मार्गदर्शन समितीच्या कामांना बळ देणारे ठरते.

समितीच्या कामांसाठी पुढील. मान्यवरांनी आम्हाला लक्षणीय मदत केलेली आहे. सर्वश्री,ना.विलासराव देशमुख (मुख्यमंत्री), ना.सुशिलकुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री ब राज्यपाल, आंध्रप्रदेश), ना.आर.आर.पाटील (उपमुख्यमंत्री), ना.छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री व बिद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री), समितीचे पदसिध्दू अध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री ना. सुरेश शेट्टी, सामाजिक न्याय मंत्री ना. चंद्रकांत हांडोरे, विभांगाच्या प्रधान सचिव डॉ.जॉयस्‌ शंकरन्‌,उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.एस्‌.एस्‌.पठाण, सहसंचालक, प्रा.मुनव्वर अली, प्रशासन अधिकारी,आयु.वा.ग.भगत यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. |

मुख्यमंत्री कार्यालयाचे तत्कालीन सचिव,डॉ.संजय चहांदे, यशदाचे महासंचालक रत्नाकर गायकवाड, प्रा. रवीन्द्र चव्हाण, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे सहसचिव आयु.सुरेश गायकवाड, उपसचिव, आयु.जयंत गायकवाड,अपंग कल्याण विभागाचे आयुक्‍त आयु. आर. के. गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे सचिव भा.ई.नगराळे, मित्रवर्य प्रल्हाद जाधव (माहिती संचालक), सुरेश बांदीले, पोपट मलिकनेर, डॉ. अविनाश ढाकणे, श्री.संजीव जाधव, श्री.भोर, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी श्रीमती सोनलस्मित पाटील यांच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल.

समितीचे ज्येष्ठ सदस्य, खासदार दादासाहेब तथा रा.सु.गवई म्हणजे आमचे उर्जाकेंद्रच होय. समितीच्या कामांमध्ये संपूर्ण बुडून गेलेले आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना मानतो. त्यांची पाठपुरावा करण्याची क्षमता अपूर्व आहे. या खंडाच्या निर्मितीत त्यांचे विशेष श्रेय आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत.

आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी वारंवार समितीच्या अडचणींना सभागृहात वाचा फोडली. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रश्‍न सुटायला मदत झाली. खासदार रामदास आठवले, माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे

(वीस)