अध्यक्ष प्रा.केशव मेश्राम यांचा विशेष ऋणनिर्देश करायला हवा. आमचे सहकारी प्रा. कासारे, आयु. कांबळे व प्रा. गोडघाटे यांनी या खंडासाठी घेतलेल्या मेहनत
आणि विस्तृत सूचीबद्दल आयु. कासारे यांचे आभार.
डॉ.कृष्णा कांबळे, डॉ.सिध्दार्थ कांबळे, प्रा. आनंद आर.गजवे, डॉ.शैलेंद्र डी.लेंडे, प्रा.पारीश सी.भगत, दिनेश व्ही.रामटेके, प्रदीप गायकवाड, आणि प्रमोद एन्.कांबळे यांचे सहकार्य या खंडाच्या कार्यात आम्हाला मिळाले. नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट कडून काही मजकूर उपलब्ध झाला.
शासन मुद्रण,लेखन सामग्री आणि प्रकाशने संचालनालयाचे प्रमुख श्री.प.ज.गोसांवी, नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक, श्री.म.शं.गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार.
समितीचे सर्व मान्यवर सदस्य आणि सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीमती उपरकर, समिती कार्यालयाचे श्रीमती शलाका तांबे, श्रीमती सु.मा.नेवरेकर,श्री.कमलाकर नीलवर्ण,श्री.मा.द.पाडावे.श्री.वि.अ.वैद्य यांचाही उल्लेख करायला हवा.
आयु.अप्पासाहेब रणपिसे, (दलितांची वृत्तपत्रे, .९६२), आयु.रत्नाकर गणवीर,(बहिष्कृत भारतातील अग्रलेख, बहिष्कृत भारतातील स्फूटलेख), डॉ.हरीश्चंद्र निर्मळे (दलितांची नियतकालिके), प्रा. सुखराम हिवराळे, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. अरुण कांबळे (जनता पत्रातील लेख: डॉ.बाबासाहेब आंबेडकर,१९९२) प्रा. गंगाधर पानतावणे (पत्रकार डॉ. आंबेडकर) यांच्या प्रयत्नाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आपल्यापुढे आली होती. तिचे समग्र रुप आपल्याला आमच्या या खंडांमध्ये बघता येईल.
डॉ.आंबेडकर भारतीय पत्रकारांचे अग्रणी आणि मराठी पत्रकारितेचे अग्रमानांकित पत्रपंडीत होते, याची जाणीव या खंडांनी सर्व भारतीयांमध्ये निर्माण होईल असा विश्वास वाटतो.
या ग्रंथातील उणिवा कळविल्यास पुढील आवृत्तीत त्या दुरुस्त करु. कृपया कळावे / कळवावे. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.
आपला स्नेहांकित,
हरी नरके
सदस्य सचिव,
डॉ. बाबसाहेब आंबेडकर चरित्र साधने
प्रकाशन समिती
(एकेवीस)