२९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हा वरील दोन्ही पंथापेक्षा अगदी भिन्न आहे. गेल्या जून महिन्यात दिल्ली येथे काँग्रेस वर्किंग कमिटीने जो युद्धविषयक ठराव पास केला व ज्यात ' इंग्रजांनी काही गोष्टी मान्य केल्या तर आपण अधिकार ग्रहण करू व लढाईत मदत करू ' असे म्हटले होते त्याला गांधींनी विरोध केला, ही गोष्ट सर्वास अवगत आहे.
हा विरोध आपण का केला याचा खुलासा जो गांधींनी केला आहे त्यावरून या गांधीपंथाची काय भूमिका आहे, हे स्पष्टपणे कळून येण्यासारखे आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास ' आपण अहिंसावादी आहोत, इंग्रजांनी अहिंसेच्या मार्गाने हिटलरचा प्रतिकार कारावा “ ही गांधींची मुख्य भूमिका आहे आणि भूमिकेनुसार त्यांचे म्हणणे आहे की काँग्रेस यावेळी अधिकारग्रहण करून मंत्रीमंडळे बनविण्याची योजना मान्य करू नये. कारण तसे जर केले तर या मंत्रीमडळांना लढाईत इंग्रजांना मदत करण्याकरिता, जे जे काही आवश्यक आहे ते ते सर्व करावे लागेल व ज्याअर्थी इंग्रज लोक हिंसक साधनांनी शत्रूचा परामर्श घेत आहेत त्याअर्थी काँग्रेस मंत्रीमंडळाला इंग्रजांना मदत केल्याने हिंसेला मदत केल्याचे पातक लागणार आहे आणि ज्याअर्थी काँग्रेस अहिंसेच्या तत्त्वाला आतापर्यंत मानीत आली आहे त्याअर्थी त्या तत्त्वाला तिने मूठमाती देण्यास सिद्ध होऊ नये. म्हणजे इंग्रज हे युद्धात हिंसक साधनांचा उपयोग करीत असल्यामुळे त्यांना या देशातील लोकांनी मदत करू नये. “ हे या गांधीपंथाचे मतवैशिष्ट्य आहे.
या गांधींच्या विचारसरणीने पुष्कळ लोक आश्चर्यचकीत झाले असतील यात काही शंका नाही. ही विचारसरणी गांधींना कधीपासून सुचली ? अहिंसेच्या तत्त्वाला बाध येतो म्हणून इंग्रजांना मदत करू नये, असे म्हणणाऱ्या गांधींना आम्ही असे विचारतो की खिलाफतीच्या चळवळीमध्ये तुमची भूमिका काय होती आणि तुमचे अहिंसेचे तत्त्व त्यांना मदत करण्याचेबाबत आड येऊ शकले काय ?
हा प्रश्न आम्ही आजच उपस्थित केला आहे असे नव्हे तर १९२१ सालात जेव्हा खिलाफतीची चळवळ सुरू झाली त्यावेळी सर्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटीचे मेंबर मि. झकेरियस ह्यांनी wee ऑफ इंडियामध्ये गांधींना, तुम्ही अहिंसावादी असताना हिंसक साधनानी खिलाफतीचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या मुसलमान खिलाफतवाद्यांस कशी मदत करू शकता, असा रोखठोक प्रश्न विचारला होता. त्याला गांधींनी जे उत्तर दिले आहे ते मोठे उद्बोधक आहे. म्हणून आम्ही खाली देत आहोत,
“Mr. Zacharias argues in the Servantto India that the Khilafatis based onforce. The Khilafath is the earthly representative of Islam pledged to defend it even with the sword. And how can |, believer in non-violence, fight to sustain an institution that is permitted to resort to physical force for its defence.