हिंदी राजकारणाचा विचका २९१
नाही. या गोष्टीला जर वेळीच आळा घातला नाही तर त्याचा परिणाम असा
होईल की वसाहतीतील कायद्याची अंमलबजावणी करण्याची अधिकारपदे ते
(काळे लोक) पटकावतील. उदाहरणार्थ, हे काळे लोक पुढेमागे हायकोर्टाचे
न्यायाधीश होतील आणि गोऱ्या लोकांना हलका दर्जा पत्करून, त्यांच्यापुढे हीनता
स्वीकारून न्याय मागावा लागेल आणि कदाचित त्यांच्याकडून (काळ्या
लोकांकडून) त्यांना (गोऱ्या लोकांना) शिक्षाही केली जाईल. असल्या गोष्टीवर माझा तर विश्वासच बसू शकत नाही.
ईश्वरा ! मी तुझे आभार मानतो की आम्ही जर्मन लोक डोक्याने राज्य चालवतो-हृदयाने नव्हे ईश्वरा ! मी तुझे उपकार मानतो की जर्मन लोक काळ्या आदमीना नीटपणे ओळखतात. काळ्या आदमीचे कार्यक्षेत्र म्हणजे आपल्या गोऱ्या धन्याची सेवा करणे एवढेच ! जर्मनांना हे पूर्णपणे कळून चुकलेले आहे.
कामेरून्समध्ये आमची इज्जत आणि आमचा दर्जा सांभाळण्यासाठी एखाद्या जर्मनाने काळ्या इसमाविरुद्ध गुन्हा केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला तरीदेखील त्याला कोर्टात (जर्मनाला) शिक्षा देता येत नाही. जर्मन गुन्हेगार दुसऱ्या जिल्हयात पाठविला जातो किंवा जर्मनीत. त्यांच्या घरी त्याची रवानगी होते.
काळा माणूस कोणत्याही दर्जाचा असो, त्याला फक्त एकाच प्रकारची शिक्षा समजते आणि तिची किंमत कळते, ती म्हणजे फटक्याची ! भरपूर सपासप बसणाऱ्या फटक्याची शिक्षा ! काळ्या आदमीला चाबकाखाली असा व्यवस्थित झोडपून काढा की फटक्याच्या यातना भोगण्यापेक्षा (गुलामगिरीचा) धोपट मार्गच अधिक सुखाचा आहे, याची त्याला लगेच जाणीव होईल. "'
इंग्रजांचा पराभव व्हावा, हिटलरला यशप्राप्ती व्हावी आणि हिटलर आला तर आपल्याला स्वराज्य देईल आणि कायदेभंगाची चळवळ करू देईल व तुरुंगात गेली तर ' ए ' क्लासात ठेवील, अशी आशा करणाऱ्या हिंदूंना आम्ही असे सुचवितो की हिटलर व त्याचे साथीदार यांच्या मनोरचनेचा त्यांनी नीटसा विचार करावा व मग इंग्रजांना युद्धात मदत करावी किंवा नाही हे ठरवावे.
गेल्या जून महिन्यापावेतो हिंदुस्थानात दोन पंथ होते. बिनशर्त मदत करणारांचा एक व शर्तीवर मदत करणारांचा दुसरा. परंतु गेल्या जून महिन्यापासून एक तिसराच पंथ उपस्थित झाला आहे. तो पंथ म्हणजे गांधींचा । तृतीय पंथ होय.