परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा. अरूण ' साठी. संदेश - Page 413

१०४
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा

“ अरुण * साठी संदेश

' श्री. गं. म. ठवरे यांच्या प्रयत्नामुळे नागपूरला 'अरुण' नांवाचे मराठी साप्ताहिक सुरू होत आहे, यात मला आनंद वाटतो. विशेषतः मुंबईच्या 'जनता' पत्राचे प्रकाशन बंद झाल्यामुळे दलित वर्गाला वरील साप्ताहिकाची फारच आवश्यकता आहे. मध्यप्रांत आणि वऱ्हाडात तर वृत्तपत्राची गरज प्रामुख्याने भासत आहे. वेळोवेळीं उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नांसंबंधी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हे वृत्तपत्र उत्तम तऱ्हेने पार पाडील अशी आशा आहे. माझ्या दलितवर्गाने 'अरुण' ला पूर्ण सहकार्य द्यावे, अशी माझी हार्दिक इच्छा आहे.

राजगृह, दादर : बी. आर. आंबेडंकर. मुंबई ता. २९ मे १९४७ ' *

१: साप्ताहिक अरुण, नागपूर-संपादक ना. खं. तिरपुडे, बी. ए., एल. एल. बी. (वकील)

सोमवार दिनांक ९ जून १९४७.