१०५
बुवांच्या निधनाची [वार्ता ] [ऐकून ] [धक्काच ] [बसला ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या. चळवळीतील अत्यंत एकनिष्ट कार्यकर्ते जी. एम. जाधव उर्फ मडके बुवा यांचे रविवार दिनांक २८ मार्च १९४८ पहाटे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या प्रेत यात्रेला साठ हजार जन समुदाय होता. यावरून त्यांचे विषयी दलित समाजात असलेले स्थान स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही दुःखद बातमी फोन द्वारे दिल्लीला त्वरीत कळविण्यात आली. या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांनी शोक संदेश पाठविला, तो असा-
मडकेबुवांच्या निधनानिमित्त |
डॉ. बाबासाहेबांचा शोक संदेश
“बुवा च्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता; कामगारांचा एक मोठा ट्रेड युनियानिस्ट; आणि शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा एक प्रभावी संघटक, नाहींसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो कीं, हा संदेश बुवांच्या प्रेतयात्रेच्या लोक-समूहांत वाचून दाखविण्यात यावा. (बुवांच्या, निधनानें ओढविलेल्या) आपत्तीत मी सहभागी असल्याचे त्यांच्या पत्नीस कळवा.
डॉ. आंबेडकर
छ 6 की
a A LR ््पघ537538।भ35े
T पाहा परिशिष्ट क्रमांक : २१
जनता : ता. ३ एप्रिल १९४८