युवक परिषद - Page 43

q
युवक परिषद

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे परिषंदांचा हंगामा. परिषदा, व्याख्यानें व ठराव यांचा पाऊस या आठवड्यांत जेवढा पडतो तेवढा वर्षांत अन्यवेळी केव्हांही पडत नाही. आणि या परिषदांत पास होणारे ठराव विशेष प्रगतिपर असतात असेंही नाहीं. साधारणतः मागील वर्षांच्या ठरावांची पुनरावृत्तीच करण्यांत येते. आणि परिषदेचें अधिवेशन आटोपल्यानंतर त्या ठरावांची स्मृतीही कोणाला रहात नाहीं. यंदाच्या अखिल भारतीय युवक परिषदेचे. अध्यक्ष मि. के. एफ. नरीमन यांच्या ध्यानांत ही गोष्ट आली असावी असें दिसतें. म्हणूनच त्यांनीं आपल्या अध्यक्षीय भाषणांत सांगितलें कीं, “युवक परिषद ही फक्त वादविवादासाठीं असेल तर देशांत तशा प्रकारच्या ज्या अनेक संस्था आहेत, त्यांत आणखी एका संस्थेची भर

पडण्यापलीकडे आणखी कांहीं होणार नाहीं."

नि. नरिमन यांचा हा इषारा अस्थानीं आहे असें कोण म्हणेल ? विशेषतः

युवक परिषदांनी. तो डोळ्याआड करून कधींच चालणार नाहीं. पण. काय

असेल तें असो. युवक परिषदांचें स्वरूपही इतर परिषदांप्रमाणेच वादविवादी

यांच्या पलिकडे गेलें नाही. “वादे वादे जायते तत्त्वाबोध: या तत्वानुसार

आचाराचें तत्व निश्चित व्हावयासाठी वादविवाद व्हावा लागतो ही गोष्ट खरी

आहे. पण त्याला कांहीं सीमा असते. त्या सीमेपलीकडे वादविवाद गेल्यास

निष्क्रियता आलीच असें समजावें. "निष्क्रियता सोडून देऊन कार्यास लागा'

असा संदेश श्री. सुभाषचंद्र बोस यांनीं युवकांना याच परिषदेत दिला आहे

खरा. पण युवक परिषदेने आपल्या पुढें जो कार्यक्रम ठेवला आहे तोच

मुळीं अशाप्रकारचा आहे कीं त्यामुळें क्रियाशक्तीला चालना मिळण्यापेक्षां

निष्क्रियता येण्याचाच जादा संभव आहे. “संपूर्ण स्वातंत्र्य ' हें युवक परिषदेचे

ध्येय अत्यंत श्रेष्ठ आहे यांत शंका नाहीं. पण ध्येयाची श्रेष्ठता क्रियाशक्तीला

चालना देते हा नियम मात्र नेहमींच खरा असती असें नाहीं. .उलट

ध्येय जितके श्रेष्ठ तितके अपयशाचे प्रसंग जास्त असतात. निष्क्रीयता येते

ती त्या मुळेच. सर्वच जण कांहीं सुभाषचंद्र अगर 'जवाहिरलाल नसतात.