2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कोणत्याही चळवळींत असल्या निधड्या लोकांपेक्षां साधारण प्रतीच्या लोकांचाच भरणा जास्त असतो. असल्या साधारण प्रतिच्या लोकांना झेपेल असा कार्यक्रम पुढे ठेवल्यास तो यशस्वी होतो. परिस्थितीचीं व मनुष्य स्वभावाची बंधने लक्षांत न घेतां म. गांधींनी असहकारितेची चळवळ पुकारिली, तिची गत काय झाली हे आपण पाहिलेंच आहे. अपयश हा गुन्हा नाहीं हे खरें. पण म्हणून अपयश नेहमीं घेत रहावें असे कोणीही म्हणणार नाहीं. असल्या अपयशांचे पर्यवसान निष्क्रियतेंत होतें हे जाणून, कोणत्याही चळवळीच्या प्रवर्तकांनी आपल्या सर्वसाधारण अनुयायांना झेपेल असाच कार्यक्रम पुढें ठेवला पाहिजे.
पण “संपूर्ण स्वातंत्र्या" चा कार्यक्रम असा नाही. सुभाषचंद्र बोस व जवाहिरलाल नेहरू यांचे अनुयायी आज या कार्यक्रमाला टाळ्या वाजवीत असले तरी या बाबतींत सोसावे लागणारे अपयशाचे तडाखे सोसण्यास त्यांपैकीं किती जणांची तयारी असेल हा प्रश्नच आहे. त्यांच्या दौर्बल्यामुळें जी निष्क्रियता येईल तीच घातक ठरेल. "'वसाहतिक स्वराज्य” वाले लोक * देशाचें नूकसान करणार नाहींत तितके ही निष्क्रियता करील. वसाहतीचे स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य यांच्यांत जी ही तेढ जवाहिरलाल प्रभृती युवकांनी उत्पन्न केली आहे, तिचें पर्यवसान हें असें आहे. मि. नरिमनला नको असणारा वादविवादच तिच्यामुळे माजला आहे. तो उपयुक्त असतां तर गोष्ट निराळी होती. पण परिस्थितीची बंधनें लक्षांत घेतां तो अवास्तवपणाचा आहे. लोकांना द्विधाचित्त करून संशयाच्या भोवऱ्यांत ढकलणारा व शेवटीं निष्क्रियता आणणारा असा-तो
७ ७ ७
& पं. मोतीलाल नेहरू वगैरे लोक.
प्रासगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ जानेवारो १९२२.
डच्त्यु-२०५७-१ ब