१११
` जुन्या वाड्मयाचा जीर्णोद्धार
मराठी वाङमयाची अनेक दिशेनें प्रगति होत असल्याचें अनेक मराठी साहित्यिकांकडून ऐकिवांत येतें. या संबंधानें माझ्या सारख्या केवळ जुन्या वाङ्मयावर वाढलेल्या माणसास मत देणे हें उचित होणार नाहीं. तथापि, जुन्या आणि नव्या मराठी वाड्मयाचा परीघ तपासून पाहतांना, हल्लींच्या चालू वाङ्मयांतून कांही प्रकारचें जुनें वाङ्मय गळून पडलें आहे. नव्हे, नामशेष झालें आहे असें म्हणणें आतताईपणाचें होणार नाहीं असें मला निश्चितपणें वाटते. जुन्या वाङ्मयांत लावणी आणि गाऱ्हाणी यांचा समावेश बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत असे. परंतु आजकालचें वाङ्मय पाहिलें असतांना, त्यांत या दोन प्रकारच्या वाङ्मयाचा लवलेश किंवा नामनिर्देशसुद्धां सांपडत नाहीं. लावणी आणि गाऱ्हाणे हीं कमी प्रतीचीं असे जरी मानलें तरी लालित्य आणि नवलाई यांच्या दृष्टीनें अशा प्रकारच्या वाङ्मयास कमी प्रतीचें मानता येणार नाहीं. हें वाङ्मय नाश झालेलें पाहून मला खरोखरच मोठा खेद होतो. या वाड्मयाचा संग्रह करण्याचा एकेकाळीं माझा मानस होता, परंतु कार्य बाहुल्यामुळें ते कार्य मला तडीस नेतां आलें नाहीं. या वाड्मयापैकी गाऱ्हाणे हें वाङ्मय काय प्रकारचें असतें याची ओळख लोकांना करून देण्याच्या उद्देशानें ' साळोबाचें गाऱ्हाणे ' मी प्रसिद्धीकरितां पाठवीत आहे. सावंतवाडी संस्थानांतील झाराप नांवाच्या गावी पंडूची पाथर म्हणून एक स्थळ आहे. त्या स्थळाच्या देवतेचे नांव ' चाळोबा ' आहे. या चाळोबाच्या नांवानें प्रतीवर्षी समाराधना घालण्याचा प्रघात आहे. समाराधनेनंतर भोजन होतें. भोजनोत्तर चाळोबापुढें नारळ ठेवून गाऱ्हाणे घालावयाचें असतें, हें गाऱ्हाणें स्थानिक महार जातीच्या माणसानें घालावयाचें असतें. गाऱ्हाण्याची सत्तावीस कलमें आहेत.
तें दरेक कलम महाराने क्रमाक्रमाने उच्चारावयाचें असतें. त्यानें उच्चारिल्यावर त्या प्रत्येक कलमाच्या शेवटी इतरांनीं ' होय म्हाराज्या ' म्हणावयाचें असतें. या गाऱ्हाण्याची कलमे खालील प्रमाणें आहेत,