डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्रत - Page 465

११०

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्रत

'“ माझ्या समाजाच्या जीवनाबद्दल मला स्वत:च्या अनुभवाने माहिती झाली आहे. आपल्या दुःखी, दरिद्रि समाजासाठी कांहीतरीं करावें या प्रेरणेनेच मी त्यांच्यासाठी झटलों आहे. माझ्यामध्ये जे काहीं सर्वोत्कृष्ट असेल तें मी त्यांना दिलें आहे. पण हें करीत असतांना मी पूर्ण विचार करून आणि जाणिवेने प्रत्येक पाऊल टाकले आहे. मी कधी कोणाच्या रागा लोभाची पर्वा केली नाहीं. सदसद्विवेक बुद्धीला पटेल तेंच मी केलें आहे. गांधीजींच्या विरुद्ध मी एकटा उभा राहिलों. मला नेस्तनाबूद करण्याचे अमेकांनीं प्रयत्न केले; पण ते यशस्वी झाले नाहींत. आज सुद्धां मी स्वतःच्या हिमतीवर राजकारणांत उभा आहे. मी कोणाचा बांधील नाहीं, पुढेंहि रहाणार नाहीं.

--डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

(किर्लोस्कर, दिल्ली विशेषांक)

कह. हो. हिं

जनता : २ फेब्रुवारी १९५२.