११२
स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा !
स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! सुसंघटित व्हा ! नि अन्यायाविरुद्ध सतत झगडत रहा | अशा तऱ्हेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीं त्यांच्या वाढदिवशी ९४ एप्रिल १९५३ रोजीं, आम्ही महामुंबईतील जनतेच्या वतीनें त्यांना पुष्पहार घेऊन भेटीस गेलो असता; आम्हांला ऐकायला मिळाला. डाँक्टर- साहेबांचे अनेक चहाते आणि मित्रपरिवार त्या दिवशीं येऊन त्यांना दिर्घायुष्य लाभो म्हणून त्यांच्याशीं हस्तांदोलन करीत होते. बाहेर तर शेंकडो स्त्री-पुरुष पुष्पहार घेऊन त्यांच्या दर्शनास तिष्ठत होते. डॉ. बाबासाहेबांनी waa अंत:करणाने सर्वास भेट दिली. ' पुंडलीकाच्या भेटी येई परब्रह्म ' याप्रमाणे जनता जनार्दनाचें तें अलोट प्रेम पाहून त्यांचे अंतःकरण आनंदानें द्रवून आले. सर्वाचे कुशल विचारलें. अति परिचित होते त्यांच्याशीं विनोद केला. आणि शिक्षक पेशाच्या लोकांना काटकसरीनें राहाण्याचा आदेश दिला.
हळुहळु जनसमुदाय नाहीसा झाला. आमच्या एका मित्रानें कांही दिवसापूर्वी, आम्हांला सागितले होते कीं, “ डॉ. बाबासाहेब जवळ जवळ बुद्धमय झालेत. बुद्धाच्या विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा बसला आहे. रात्रंदिवस ते त्याच विचार तंद्रीत असतात.” याही वेळी आम्हाला तोच अनुभव आला, बाबासाहेबांपुढें विचारांची वलये फिरत असतानाच, आम्ही भीत भीतच म्हणालो, साहेब कांही संदेश द्याल तर बरें होईल ! आतापर्यंत त्यांच्या अनेक जयंत्या झाल्या पण त्यांनीं त्यांच्या वाढदिवशी कोणाला कांही सांगितल्याचे आमच्या ऐकण्यांत वा वाचण्यांत नाहीं. या वेळेस मात्र तें विचारमग्नस्थिठींत असतानाच त्यांनां वरील उद्गार काढलें. यावरून बाबासाहेब दलित वर्गापुढील समस्यांचा रात्रंदिवस विचार करीत असावेत नि लवकरच ते कांहीं तरीं क्रांतीकारक निर्णय जाहीर करतील असे आम्हांला वाटते.
सध्यां हे चाललें आहे तरी काय ?
बोलता बोलता ते म्हणाले ” सध्या हे काय चाललें आहे. सरकार दारुबंदी पायी लाखो करोडो रुपयांची झीज सोसते पण देशातील कोट्यावधी लोक आज