स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! - Page 471

स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! ४२९

विषमतेनें भाजून निघत आहेत ते काय सरकारला दिसत नाहीं. कागदावरील योजनांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण दलित वर्गासाठी सरकार एकही भरीव योजना अंमलात आणू शकत नाहीं. नेहरुंसारखे जबाबदार गृहस्थ म्हणतात मी कन्याकुमारीपासून तो हिमालयापर्यंत फिरलो पण अस्पृश्यता अस्पृश्यता म्हणतात ती मला कोठेंही पाहायला मिळत नाहीं ! देशात लाखो.एकर जमीन लागवडीविना पडली असता गोरगरीब शेतकऱ्यांना व दलित वर्गांना ती लागवडीस दिली जात नाहीं. टिचभर वतनाच्या जमिनी पायीं संबंध गावच्या महारांना राबवून घेण्यात येते. विशाद करण्यासारखी महत्वाची कोणती गोष्ट असेल तर पवित्र राज्य घटनेची चाललेली पायमल्ली | घटनेने दलित वर्गाला दिलेले अधिकार आजची राज्य सरकारे उघड उघड डावलित आहेत. लोकशाहीचा हा सारा फार्स पाहिला कीं, सध्याच्या लोकशाहीं सरकारवर कितपत विशवास ठेवावा याचें वैशम्य वाटते.''

डॉक्टरसाहेबांचे हे विचार पाहिले किंवा ऐकले म्हणजे या देशातील दलित वर्गापुढें काय वाढून ठेवलें आहे याची कल्पना येते. दिवसेंदिवस जी बेकारी वाढत आहे तिला सरकार आळा घालू शकत नाही. बेकारीच्या त्या खायीत अधिकाधिक कोणता वर्ग लोटला जात असेल तर तो अस्पृश्य वर्ग. खेड्या पाड्यातील परिस्थितीच्या गर्तेत कोण सापडला असेल तर तो दलित वर्ग होय ! कायद्याने सरकारी नोकरींत टक्केवारी ठेवली पण त्याची अंमलबजावणी होते की नाहीं याचे नियंत्रण सरकार करायला तयार नाही. पडीत जमिनी दलित वर्गाला लागवडीसाठी देण्यात याव्यात तर त्या त्याच्या पदरात न पडतील अशीच व्यवस्था चालू आहे. अशा एक ना अनेक गाऱ्हाणी रोज आमच्याकडे येतात. शिवाय ब्रिटीशांची परंपरा चालवायची म्हणून कीं काय फोडा नी झोडा या अनितीचा अवलंब करून सरकार दलित वर्गाच्या संघटनेचा विचका करू पाहते. स्वातंत्र्यात सारे काही ठीक होईल म्हणणारे आजचे सरकारी धुरा वाहणारे लोक ते हेच का अशी शंका मग मनाला चाटून जाते.

याला उपाय सुसंघटित व्हा !

राज्यकर्त्यांचे हे डाव हाणून पाडायचे झाल्यास दलित वर्गाने आपले सारे मतभेद विसरुन सुसंघटीत व्हायला पाहिजे. आपली ताकद पणाला लावून आपल्या शक्तिचा प्रभाव आपण दाखवायला हवा. बाबासोहब नेहमी सांगतात कीं,

हजारो बाजार बुणग्यांचे सैनिक असण्यापेक्षा मला दहाच शिस्तीचे प्रामाणिक

वाय ६४१ - ३०