रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 501

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४५९

भारतीय घटनेच्या ह्या उपोद्घातांमधील ध्येय व उद्दिष्टें [न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व] साध्य करणें हेच रिपब्लिकन yard ध्येय व उद्दिष्ट राहील.

हीं उद्दिष्टे साध्य करण्यासाठीं स्पिब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारांत खालील तत्वांना बांधलेला राहील,

(१) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेंच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असें मानण्यांत येईल. आणि यानुसार जेथें समता नाहीं तेथें ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथें ती नाकारण्यांत येते, तेथें, ती राबविण्यासाठी लढा देईल.

(२) प्रत्येक व्यक्तीचें सुख हा केंद्रबिंदु समजण्यांत येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समानसंधी मिळेल. शासनसंस्था (State) ही, हें साध्य मिळविण्यासाठी वापरावयाचें साधन होय.

(३) इतर देशबांधवांच्या हक्कांचे व शासनसंस्थेच्या आवश्यक तेवढ्या अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरीकांस धार्मिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य असलें पाहिजे असे हा पक्ष मानील.

(४) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असंल्याचें हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळाली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षां अग्रक्रम देण्याचें तत्व पक्ष अंगिकारील.

(५) प्रत्येक व्यक्तीस जीवनांतील गरजा व भीति यापासून मुक्ति मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्याने देईल.

(६) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील

आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची,

किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.

(७) व्यक्ति व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीनें संसदिय राज्यपद्धति (Parliamentary System of Government) ही सर्वोत्तम राज्यपद्धति आहे अशी या पक्षाची श्रद्धा राहील