४५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
[४] पक्ष म्हणजे काय ?
पक्ष हा सैन्यासारखा असतो, त्याला खालील बाबींची आवश्यकता असतें.
(१) सरसेंनापतीसारखा पुढारी (नेता),
(२) संघटना, तींत |
(अ) सभासद,
(ब) मूलभूत योजना,
(क) शिस्त, या गोष्टींचा समावेश होतो.
(३) ध्येय आणि धोरण, तत्वज्ञान.
(४) कार्यक्रम.
(५) राजकीय sate व मुत्सद्देगिरी [ म्हणजेच ध्येयसिद्धीसाठीं, तारतम्याने कोणती गोष्ट, केव्हां व कशी करायची याची योजना]
सोप्या भाषेंत सांगायचें झाल्यास, विशिष्ट ध्येयवादानें प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय लोकसत्ताक पक्ष) हया संस्थेस पक्षाला मान्य असलेल्या तत्वज्ञानाच्या व उद्दिष्टांच्या पुर्तिसाठीं मतदारांची (जनतेची) संघटना करावी लागेल. ही पक्ष संघटना पुढील प्रमाणें काम करील :--
(१) पक्ष स्थापनेसाठीं व त्याच्या संघटीत वाढीसाठी झटणें; आणि पक्षाचे तत्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करणें ;
(२) पक्षाची तत्वे, विचारसरणी यांचा प्रचार, वृत्तपत्रे, सभा-संमेलनें, व्याख्याने, वाङ्मय-लेखन इत्यादि मार्गाने करणे;
(३) पक्ष सभासदांच्या वतीनें संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृति करण्यासाठीं निवडणुका लढविणें.
[५] । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया '--ध्येय व उद्दिष्टे
(१) भारतीय घटनेचा उपोद्घात (Preamble) पुढीलप्रमाणें आहें--
' आम्हीं भारतांतील लोक प्रतिज्ञापूर्वक असें ठरवितो कीं, भारत हें स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यांतील सर्व नागरिकांना--सामाजिक, आर्थिक, व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य, संधि व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राषष्ट्रेक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी Fi.”