ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स ४६३
विद्यालयाला भेट देण्याचा योग आला नाही हे दुर्देव. ते प्रशिक्षण विद्यालय त्यांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन बंद पडले. ते विद्यालय अत्यंत उपयुक्त ठरले असते. राज्यकारभाराला योग्य वळण लावण्यासाठी जाणत्या नि लायक, तज्ज्ञ नि कर्तुत्ववान आमदारांचः नि खासदारांचा विधिमंडळांना नि लोकसभेला पुरवठा झाला असता ! " *
संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा des तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारून टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होऊ शकतो. “ संसदीय वक्तृत्वाबद्दल बाबासाहेबांनी काढलेले हे उद्गार त्यांनी आपल्या संसदीय कारकीर्दीमध्ये सार्थ करून दाखविले. कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला प्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे. लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडविण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती ह्याची त्याने प्राप्ती केली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी ह्या जाणिदेने आपल्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात मुंबईत जुलै १९५६ पासून संसदीय शिक्षण देणारी एक आदर्श संस्था ' ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स ' स्थापन केली होती. त्यात राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर वक्तृत्वसाधनेला प्राधान्य दिले होते. खुद्द बाढग्साहेब ह्या संस्थेचे संचालक होते. डिसेंबर १९५६ मध्ये वक्तृत्वावर व्याख्याने देण्याचे त्यांनी निश्चित केले होते. दुर्दैवाने त्यांच्या अकस्मात परिनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ही संस्था आणि तिचे उत्सुक विद्यार्थी मुकले. "" २
१ . करैर्, पू. ५११, ५१२.
२ : रेगे पु. ८०-८१.