११६
ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स
मारतीय संविधानाने अंगिकारलेल्या संसदीय प्रणालीतील केन्द्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळातील प्रतिनिधींचे व्यक्तिमत्व शील आणि प्रज्ञायुक्त असावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन इच्छा होती. या संदर्भात २३ नोव्हेंबर १९५० रोजी त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात आपले विचार व्यक्त
केले आहेत. *
उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या उद्देशाने त्यांनी मुंबई येथे ' ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स ' सुरु केले. या संस्थेचे संचालक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी शां. शं. रेगे हे रजिस्ट्रार होते. या संबंधीची माहीती खालील प्रमाणे आहे--संपादक.
' देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक
चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची
भरती होत राहावी ह्या हेतूने राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ इच्छिणाऱ्या
लोकांसाठी मुंबई येथे एक प्रशिक्षण विद्यालय (ट्रेनिंग स्कूल) सुरू करावे असे
डॉ. आंबेडकरांनी ठरविले. ग्रंथपाल शां. शं. रेगे यांच्या सहाय्याने ते
प्रशिक्षण विद्यालय स्थापण्यासंबंधी ते खटपट करीत होते. जे विधिमंडळात
कामकाज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या
प्रशिक्षण विद्यालयात करावयाची होती. त्या प्रशिक्षण विद्यालयाच्या
मुख्याध्यापकाच्या जागेसाठी त्यांना लायक व्यक्ती पाहिजे होती. शिक्षक
होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम
रीतीने व्याख्यान देता आले पाहिजे. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक
पाहिजे. विद्यालयाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर आणि वक््तृत्वाच्या
सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे त्यांनी रेग्यांना लिहिले. १ जुलै
१९५६ ते मार्च १९५७ पर्यंत शां. शं. रेगे यांच्या देखरेखीखाली ते प्रशिक्षण
विद्यालय चालले. त्याचे संस्थापक आणि चालक डॉ. आंबेडकर यांना त्या
* Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol. 15. P. p. 188-192. .