परिशिष्ट-१
बँ. जयकर यांचे भाषण
हिंदी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष या नात्यानें बॅ. जयकर यांनीं केलेल्या भाषणाचा गोषवारा खाली दिला आहे.
सुधारणेचा इतिहास
सामाजिक सुधारणेची चळवळ करणें हैं एका काळीं फार कठीण काम होतें. तिच्यात भाग घेणारांस पुराणमतवादी लोकांचा छळ व उपहास सहन करावा लागे. राष्ट्रीय सभेचा मंडप सामाजिक परिषदेसाठी मिळणेंही तेव्हां दुष्कर होतें. पण तो काळ आतां राहिला नाहीं. राजकीय सुधारणा आधी कीं समाजसुधारणा आधीं हा वाद आतां मागें पडला आहे; व दोन्ही सुधारणा एकसमयावच्छेदेकरून झाल्या पाहिजेत हें तत्व सर्वाना पटलें आहे.
पूर्वी व आतां
आद्य सुधारकांचे सुधारणेचे प्रयत्न मूलगामी नव्हते. स्त्रियांचा पुनर्विवांह, हुंडा, शिक्षण वगैरे प्रश्नांपलीकडे त्यांची नजर गेली नाहीं. पण हल्ली जी सुधारणेची चळवळ चालू आहे तिची व्याप्ती फार मोठी आहे. सामाजिक व्यवहारांत आमूलाग्र क्रांति घडवून आणणें हें तिचें ध्येय आहे. अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्या चळवळीकडे पाहिल्यास ही गोष्ट ध्यानांत येईल. हे वर्ग सामाजिक समतेसाठी झगडत आहेत. समतेला मारक अशीं जीं जीं धार्मिक नियमने आहेत, त्यांच्याविरुद्ध या चळवळींचा मोर्चा आहे.
राजकीय हकक व सामाजिक समता
आणि राजकीय प्रगतीमुळे सामाजिक समतेची ही चळवळ आजच्या स्वरूपाला
पोचली आहे. प्रातिनिधिक संस्थांचा प्रवेश हिंदुस्थानांत झाल्यामुळें व्यक्तींचा दर्जा वाढला, व त्यामुळेच सामाजिक समतेची मागणी सुरू झाली. जातिभेदाचीं बंधनें असह्य होणें हेंही अर्थातच अपरिहार्य झालें. जातीभेदाची उत्पत्ती व प्राचीन कालीं त्यांची उपयुक्तता काय होत असेल ती असो. पण आज जातीभेद हा आपल्या राजकीय प्रगतीच्या मार्गात एक विघ्न होऊन बसला आहे. जातीनीं परस्परांशी ममतेनें वागावें या म्हणण्याला आतां कोणी किंमत