` परिशिष्ट-८
हिंदु देवालये व अस्पृश्यता [| ]
शेठ जमनालाल बजाज यांचे भाषण .
गेल्या ता. ३१ जुलै रोजीं वऱ्हाडांतील-मोंगलाइच्या वेळची राजधानी एलीचपूर. येथील “दत्त दरबार' या नांवानें सुप्रसिद्ध असलेल्या श्री. दत्तमंदिराचीं द्वारें अस्पृश्य . मानलेल्या. वर्गालासुद्धां सर्व हिंदूंना vas करण्याचा समारंभ राष्ट्रीय सभेच्या अस्पृश्यताविरोधक कमिटीच्या तर्फे साजरा करण्यांत आला... देवालय अस्पृश्यांना मुक्तद्वार करण्याच्या बाबतीत सर्व ट्रस्टींचे एकमत आहे असें:सदरील प्रसंगी जाहीर करण्यांत आलें आणि देवालयावर तें बहिष्कृतांसुद्धां. सर्व हिंदूना मुक्तद्वार असल्याबद्दलची पाटी लावून. ती शेठ जमनालाल बजाज यांच्यां हस्ते अनावृत्त करण्यांत आली. पाटीवरील पडदा दूर केल्यावर'-शेठ जमनालाल बजाज.:यांनी जमलेल्या मंडळीच्या समवेत देवालय़ामध्ये प्रवेश केला. “या मंडळींत बहिष्कृत वर्गातली सुमारे 4o माणसें “होतीं... सदरील प्रसंगी: शेठ जमनालाल यांचें पुढील आशयाचें भाषण झालें -' ४.
ज्या आपल्या धर्मबांधवांची आपण आतांपर्यंत उपेक्षा केली त्यांच्याकरिता या देवालयाची द्वारें आज खुलीं करण्यांत येत आहेत. या प्रसंगीं माझ्याकडून आपण विद्दत्ताप्रचुर भाषणाची अपेक्षां करीत नसालंच, कारणे तुंम्हाला माहीतच आहे कीं, मी कांहीं कोणी शास्त्री. किंवा पंडीत नाहीं. धर्मशास्त्रांतील वचनें घेऊन त्यांच्यावर पांडित्याची कसरत करणें मला शक्य नाहीं. फार काय परंतु संस्कृत भाषाहि मला अवगत नाहीं. जे वर्ग अस्पृश्य म्हणून समजून आम्ही त्यांना वागवीत आहों त्यांच्या संबंधाचा प्रश्न हा खरोखर अगदीं सोपा व साधा असा प्रश्न आहे. त्यांत कांहीं पांडित्य किंवा वकिली पाहिजे असें नाहीं. हा केवळ न्यायानें वागविण्यासंबंधाचा प्रश्न आहे, इतकेंच नव्हे तर
आपण वरिष्ठवर्गीय हिंदूंनी आपल्या पापांचें क्षालन करण्यासाठीं हें प्रायश्चित
घेणें आहे असें मी म्हणतों. ज्या रीतीनें अस्पृश्यांना आम्हीं आतांपर्यंत वागविले व सध्या वागवीत आहों ती सर्वथैव अक्षम्य आहे हें कोणीहि नाकंबूल करूं शकणार नाहीं. आपला कौटुंबिक धर्म असा आहे कीं, कुटुंबांतील वडील व जाणत्या माणसांनींच कुटुंबाच्या योगक्षेमाची जबाबदारी घेतली पाहिजे, कुटुंबांतील जीं कोणी माणसें दुर्बल व स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असतील [त्यांची ]