परिशिष्टे - Page 526

४८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काळजी घेतली पाहिजे, इतकेंच नव्हे तर कुटुंबांत जरी एकादा वेडापिसा व निकामी मनुष्य असला तरी त्याचा सांभाळ केला पाहिजे, आणि कुटुंबांतल्या सर्व माणसांना समतेनें वागविलें पाहिजे. आपला कौटुंबिकं धर्म हा “देवाण घेवाण' या न्यायाचा नसून प्रेमावर आधारलेला आहे. संमाज म्हणजे एक मोठ्या प्रमाणावरील कुटुंबच होय. AA तोच धर्म लागू असला पाहिजे. समाजांतल्या. जाणत्या व पुढारी माणसांवर आणि afte वर्गावर निकृष्ट मानलेल्या वर्गांना प्रेमानें व ममतेनें वागंविण्याची जबाबदारी आहे. वरिष्ठपणा किंवा पुढारीपणा म्हटला कीं ही जबाबदारी आलीच. अस्पृश्य मानलेल्या वर्गातील लोक अज्ञान, वेडगळ, धर्मसमजुतींना चिकटून राहणारे, अस्वच्छतेनें वागणारे आहेत म्हणून आम्ही त्यांची उपेक्षा करतों असें म्हणणें योग्यं नव्हें. उलट,. अस्पृश्य मानलेले लोक अज्ञान व अस्वच्छ राहणीचे आहेत याकरितां त्यांची आप॑ण विशेष काळजी घेतली पाहिजे; त्यांना सज्ञान केलें पाहिजे, त्यांना स्वच्छतेनें राहण्यास शिकविले पांहिजे, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे त्यांच्यांत आपण माणुसकीचा अभिमान उत्पन्न केला पाहिजे. पण'खरोखर पाहतां आपण तसें करितों काय ? त्यांना आपण परमेश्वराच्या घरांत-देवालयांत जाण्यासहि मज्जाव करतों. ईश्वराला “जगत्पितां,! “जगन्माता,” “पतितपावन” अशा नांवांनी संबोघणारे आम्ही वरिष्ठजातीय ` हिंदु लोक तोच परमेश्वर एकाद्या अस्पृश्याला आपल्या दर्शनाने पावन करण्याच्या ऐवजीं त्याच्या संपर्काने विटाळतो, त्याला आपल्या हीनदीन बालकाचा संसर्ग खपत नाहीं, असें AM. हा एक प्रकारचा दैवदुर्विलासच नव्हे काय ? आम्हां वरिष्ठजातीय हिंदूंना. अत्यंत लज्जास्पद अशी ही गोष्ट नव्हे काय ?

परमेश्वराचा छळ !

आपला कौटुंबिक धर्म कशा प्रकारचा आहे हैं मीं नुकतेच आपल्यास सांगितलें आहे. जो पिता आपल्या मुलांना पंक्तिप्रपंचानें वागवितो त्याला तुम्ही काय म्हणाल? ' अथवा कुटुंबांतील जे वडील मुलगे आपल्या धाकट्या दुर्बळ भावांना आपल्या आईला भेटावयास जाऊं देणार नाहींत आणि त्यांना कायमचे अलग करून ठेवावयास पाहतील त्यांना तुम्ही काय म्हणाल? आपल्या कनिष्ठ अपत्यांना आंपल्यापाशीं येण्याला ज्येष्ठ अपत्यांनीं प्रतिबंध केला तर मातेच्या मनालां किती वेदना होतील याची तुम्हीच कल्पना करा. आपल्याच धर्मबांधवांना | देवालयांत जाण्यास मज्जाव करणें म्हणजे देवालयाचा जो उद्देश आहे त्याच्यावर कुऱ्हाड घालणें होय. आमची परिस्थिती विशेष चांगली आहे, तेव्हां आम्ही आमच्यापेक्षा ज्यांची स्थिती वाईट आहे त्या आपल्या धर्मबांधवांना हातभार लावावयाचा कीं, त्यांचा जो जन्मजात हक्क आहे म्हणजे देवालयांत जाऊन