परिशिष्टे - Page 560

परिशिष्ट-१५
बेनीतो मुसोलिनी

मुसोलिनी बेनीतो : (२९ जुलै १८८३ - २८ एप्रिल १९४५) इटलीचा हुकूमशहा (१९२२-४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म सामान्य लोहाराच्या कुटुंबात दोव्हिया (प्रेदाप्या) येथे झाला. त्याचे वडील आलेस्सांद्रो हे समाजवादी अंसून लोहारकाम करीत, तर आई रॉझा ही प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. फॉर्लीम्‌ पॉपॉली येथील शाळेतून मुसोलिनीने अध्यापनाची पदविका मिळविली (१९०१). शिक्षक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर तो स्वित्झर्लडला पळून गेला (१९०२); परंतु खोट्या पारपत्रामुळे त्याला इटलीला परतावे लागले (१९०४). या काळात त्याने कार्ल मार्क्स, सोरल, प्येअर प्रूदाँ, लुई ब्लांकी, प्यॉटर क्रपाँटक्यिन इ. विचारवंतांचे साहित्य वाचले ar तो कट्टर समाजवादी कामगार नेता बनला, राजकीय प्रचारासाठी त्याने ट्रेन्टमधील लालोता .दी क्लास या प्रांतिक वृत्तपत्राचे संपादकत्व स्वीकारले. यानंतर त्याची समाजवादी पक्षाचा संचालक म्हणून निवड झाली आणि तो लवकरच अवंती या मिलानमधील वर्तमानपत्राचा संपादक झाला (१९१२). त्याच्या परखड, सडेतोड लेखनामुळे अवंतीचा खप चौपटीने वाढला. पहिल्या महायुद्धा इटलीने तटस्थ राहावे, ही आधीची भुमिका सोडून त्याने देशाच्या महायुद्धप्रवेशाचे समर्थन केले. परिणामतः समाजवादी पक्ष व अवंती यांमधून त्याची हकालपट्टी झाली (१९१४). त्यानंतर त्याने आपल्या विचारांच्या प्रसारार्थ पोपोलो द इतालिया हे स्वतंत्र वृत्तपत्र काढले.

मुसोलिनीने मिलान येथे २३ मार्च १९१९ रोजी फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यानंतर १९२१ मध्ये तो संसदेवर निवडून आला. आंदोलनाचा मार्ग अवलंबून फॅसिस्टांनी बोलोन्या आणि मिलान या शहरांचा ताबा घेतला प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यास असमर्थ ठरत होती. अशा वेळी नेपल्स येथे फॅसिस्टांचे अधिवेशन भरले (१९२२). त्यात लूईजी फाक्ता सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. फॅसिस्टांना कारीखानदारांसह उच्च मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळाला. तेव्हा त्यांनी रोमवर मोर्चा काढला (२८ ऑक्टोबर १९२२). राजाने लष्करी कायदा पुकारण्या- ऐवजी फाक्ताचा राजीनामा घेऊन मुसोलिनीला नवीन मंत्रिमंडळ बनविण्याची