परिशिष्टे - Page 561

परिशिष्टे ५१९

आज्ञा केली. त्याने फॅसिस्ट व राष्ट्रीय पक्षाचे संयुक्‍त सरकार बनवले. राजाने

व संसदेने मुसोलिनीला पंतप्रधान करून सर्वाधिकार दिले. सुरुवातीस त्याने

घटनात्मक चौकटीतून शांतता प्रस्थापित करून अंतर्गत कारभारात फॅसिस्ट.

अधिकारी नेमले व राजाकडून आपल्या लष्करी संघटनेला मान्यता मिळविली.

हळूहळू मुसोलीनीने नवा मतदान विषयक कायदा संमत करून, संसदेत आपल्या

पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित केले (१९२४).

फॅसिस्ट दहशतवादाला समाजवादी सदस्य गीया जाकोमो मात्तेऑत्ती याने

फॅसिस्टी एक्सपोझूड नावाच्या ग्रंथातून गुन्ह्यांची यादी सादर करून कडवा

विरोध केला, तेव्हा त्याचा खून करण्यात आला (१० जून १९२४). काही

दिवस मुसोलिनीच्या लोकप्रियतेला धोका निर्माण झाला. तेव्हा मुसोलिनीने

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादून विरोधकांच्या सभांवर बंदी

घातली. उदारमतवादी आणि कम्युनिस्ट यांनी यावेळी उग्र निदर्शने केली:

पण ती कठोरपणे मोडण्यात आली. अखेर मुसोलिनीने संसदे कडून

३१ जानेवारी १९२६ रोजी एका: अधिकृत कायद्याने. राज्य करण्याचा “संपूर्ण

अधिकार मिळविला आणि त्याने संप आणि टाळेबंदी अवैध ठरवून फॅसिस्ट युवक

संघटना स्थापल्या. त्याच्या डोळ्यासमोर आर्थिक पुनर्रचनेवर आधारित इटलीचे

श्रेणीसत्ताक राज्य (कार्पोरेटीव्ह स्टेट) स्थापन करण्याचे ध्येय होते. लोकशाही विरोधी भूमिकेमुळे त्याच्यावर तीन-चार प्राणघातक पण अयशस्वी हल्ले. झाले. त्याने एका कायद्याने कामगारांचे कामाचे तास वाढवून नगरपालिका, प्रांत आणि पुढे सार्वत्रिक निवडणुका रद्द केल्या आणि पोलीस व लष्करी. यंत्रणेत स्थायी सेवेवर फॅसिस्ट स्वयंसेवक नेमले. १९२८ मध्ये फॅसिस्ट ग्रँड कौन्सिल (पक्षाचे वरिष्ठ मंडळ) हीच शासनाची सूत्रधार होती आणि मुसोलिनी हा सर्वसत्ताधारी होता.

परराष्ट्रीय धोरणात मुसोलिनीच्या डोळ्यापुढे इटलीचे साम्राज्य -रोमंन एंपायंर- ही कल्पना असल्यामुळे साम्राज्यविस्तारास त्याने सुरुवात केली, इथिओपियावर स्वारी केली (१९३५) आणि ते इटालियन साम्राज्यात समाविष्ट केले. १९३९ मध्ये त्याने अँबिसिनिया पादाक्रांत केला. प्रारंभी त्याला हिटलरविषयी आस्था नव्हती; परंतु राष्ट्रसंघाने इटलीचे सभासदत्त्व रद्द केले आणि त्याच वेळी मुसोलिनीने स्पॅनिश यादवी युद्धात बंडखोरांचा नेता फ्रँको याला सहकार्य दिले. तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स या देशांशी त्याचे वैर निर्माण झाले. परिणामतः त्याला जर्मनीवर अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले. साहजिकच तो जागतिक परिस्थितीला अनुसरून हिटलरच्या पूर्ण कच्छपी गेला आणि हिटलरच्या ज्यू द्वेष